एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बाहुबली चित्रपटातील ‘कालकेय’ आठवतो का? सध्या करतोय हे काम ऐकून विश्वास बसणार नाही..

बाहुबली चित्रपटातील हा खतरनाक विलेन खऱ्या आयुष्यात आहे असा, आता दिसतोय असा, करतोय हे काम..पहा

बाहुबली या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रचंड गाजले. त्यावर लोकांनी भरभरून प्रेम केले. या चित्रपटातले सर्व कलाकार आजही लोकांच्या लक्षात आहेत. याच चित्रपटाच्या पहिला भागातील सर्व प्रेक्षकांचा थरकाप उडवणारे पात्र म्हणजे कालकेय. कालकेय चा लूक आणि त्याची प्रचंड वेगळी भाषा हे आजही सर्वांच्या लक्षात आहे. पण हा कालकेय सध्या काय करतोय आणि त्याला कालकेय चा रोल कसा भेटला हे आपण जाणून घेऊया. सध्या तो बेरोजगार असल्याच्या अ’फवा उठवल्या जात आहेत मात्र असे काहीही नाही.

कालकेय चे खऱ्या आयुष्यातले नाव प्रभाकर असे आहे. प्रभाकर हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक उमदा अभिनेता आहे. प्रभाकर याचा जन्म तेलंगणामधील महबूबनगर जिल्ह्यातील कोडंगल या गावात झाला होता.

आपण क्रिकेटपटू व्हावे असे त्याला लहाणपणापासून वाटायचे. पण ते काही मर्यादांमुळे शक्य झाले नाही. बारावीची परीक्षा दिल्यानंतर प्रभाकर हा हैद्राबादला आला. तो तिथे त्याच्या एका नातेवाईकाकडे राहत होता.

प्रभाकर हा स्वभावाने अत्यंत लाजाळू आहे. नातेवाईकांनी त्याला रेल्वे पोलीसात नोकरी मिळवून देतो असे वचन दिले. पण ते वचन पूर्ण करू शकले नसल्या कारणाने प्रभाकर हा सहा वर्षे बेरोजगार राहिला. तो नोकरी शोधत राहिला.

शेवटी प्रभाकरच्या एका मित्राने त्याला एस एस राजामौली यांना मगधीरा या चित्रपटासाठी काही लोकांची गरज आहे आणि ते तुला कामावर घेऊ शकतात असे सांगितले. तेंव्हा प्रभाकर हा अॉडीशन द्यायला गेला पण राजामौली त्यावेळी त्याला काहीच बोलले नाही.

तिथून राजामौली त्याला राजस्थानला घेऊन गेले. तिथे त्याने मगधीराचे शूटींग पाहिले. काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्नही केला. शेवटी राजामौली यांनी मर्यादा रमन्ना या चित्रपटात त्याला एक छोटीशी भूमिका देऊ केली. अशाप्रकारे प्रभाकरला त्याचा पहिला चित्रपट मिळाला.

यावेळी एक अडचण अशी होती की प्रभाकरला अभिनयाविषयी जास्त माहिती नव्हती. तेंव्हा राजामौली यांनी त्याला अभिनय शिकण्यासाठी देवदास कनकला येथे पाठवले. शिकण्यादरम्यान त्याला दहा हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळाली व त्याने त्याचे त्यातून कर्ज फेडले.

मर्यादा रमन्ना या चित्रपटानंतर प्रभाकर हा मगधीरा या चित्रपटातही काम करताना दिसला. त्यानंतर बाहुबलीमधल्या भूमिकेने तो अतिशय लोकप्रिय झाला. बाहुबली च्या सिक्वलमध्ये मात्र प्रभाकर दिसला नाही. कारण त्याच्या पात्राचा प्रवास पहिल्या भागातच संपला होता.

आजघडीला प्रभाकरने ४० हून अधिक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. प्रभाकर सांगतो की, आज मी जो काही आहे तो एस. एस. राजामौली यांच्यामुळेच आहे. त्यांचा मी सतत ऋणी राहिन. अशाप्रकारे कालकेय अर्थातच प्रभाकर सध्या आनंदात आहे. आपलं आयुष्य कधी बदलेल काहीच सांगता येत नाही फक्त आपण आपलं कार्य करत राहिलं पाहिजे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like