एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘अग्गंबाई सासूबाई’ मधल्या बबड्याचा नवा लूक! आशुतोष पत्की ने दिला नवा अपडेट..

सध्या ‘अग्गंबाई सासूबाई’ (२०१९) मालिका चालू नसल्याने यातल्या कलाकारांबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. या मालिकेच्या वेगळ्या विषयामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यातल्या बबड्याचे पात्र तर लोकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. हे पात्र साकारले होते आशुतोष पत्कीने.

ही मालिका संपल्यानंतर मात्र आशुतोष पत्की च्या बाबत कोणतीच बातमी समोर आली नाही. नुकताच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून एक अपडेट शेअर केला आहे.

‘काहीतरी नवीन’ असं कॅप्शन टाकून त्याने हा अपडेट दिला आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ नंतर आशुतोष चा कोणताही नवा प्रोजेक्ट सुरू नव्हता. या नवीन फोटो मध्ये तो स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे. त्याचा नवीन प्रोजेक्ट सुरू होणार असल्याचीच ही चिन्हे आहेत. नक्की कोणता प्रोजेक्ट आहे हे त्याने सांगितले नाहीये. त्यामुळे ही नवीन मालिका आहे की चित्रपट हे अजून समजले नाहीये.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐀𝐬𝐡𝐮𝐭𝐨𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐤𝐢 (@ashutoshpatki)

आशुतोष पत्की हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ नंतर त्याने आपला लूक बदलल्याचेही पाहायला मिळते. हा लूक नवीन प्रोजेक्टसाठी आहे की असाच केला आहे, हा देखील एक प्रश्न आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही काही आशुतोषची पहिली मालिका नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐀𝐬𝐡𝐮𝐭𝐨𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐤𝐢 (@ashutoshpatki)

या आधी त्याने ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या मालिकांमध्ये कामे केली आहेत. ‘वन्स मोअर’ (२०१८) या चित्रपटातून त्याने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने ‘शहीद: भाई कोतवाल’ (२०२०) या चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे.

आशुतोषने या आधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले असले तरी ‘अग्गंबाई सासूबाई’ मधील त्याच्या ‘बबड्या’ च्या भूमिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेत तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ, गिरीश ओक यांसारखे कलाकारही होते. सध्या आशुतोषचा नवीन प्रोजेक्ट येतो आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐀𝐬𝐡𝐮𝐭𝐨𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐤𝐢 (@ashutoshpatki)

आशुतोष पत्की सोशल मीडिया वर बराच सक्रीय आहे. तो नेहमी आपले फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत असतो. त्याचे चाहते त्याच्या फोटो आणि व्हिडिओ वर कमेंट्स आणि लाईक्स चा वर्षाव करताना दिसतात.

त्याच्या या नवीन प्रोजेक्ट बद्दल त्याचे चाहतेदेखील प्रचंड उत्सुक आहेत. या नव्या प्रोजेक्ट मध्ये आशुतोष कोणत्या नव्या भूमिकेत दिसतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आशुतोषला असेच नवनवे प्रोजेक्ट्स मिळत राहोत आणि त्याच्या चाहत्यांना त्याला पडद्यावर पाहण्याची संधी वारंवार मिळत राहो. आशुतोषच्या नवीन प्रोजेक्ट साठी आमच्या टीम कडून त्याला खूप खूप शुभेच्छा!

You might also like