एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अशोक सराफ आणि निवेदिता यांची लव्ह स्टोरी! वयात अंतर असलं तरी प्रेमात कधीच अंतर पडलं नाही..

सिनेसृष्टीतल्या कलाकारांबद्दल सामान्य माणसाला असलेले कुतूहल सर्वज्ञात आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात चालणाऱ्या घडामोडींबद्दल नेहमीच लोकांना उत्सुकता असते. त्यात जर या वैयक्तिक गोष्टी त्यांच्या अफे;यरच्या किंवा वैवाहिक जीवनाबद्दल असतील, तर लोकांना ते जाणून घेण्यात अजूनच रस निर्माण होतो. विशेषतः जर ते कलाकार तुमच्या आवडीचे असले, तर त्यांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठीही लोक धडपड करत असतात.

आज अशाच एका सेलिब्रेटी कपल च्या लव्ह स्टोरी बद्दल जाणून घेऊया. अशोक सराफ म्हणजे अभिनयाचा बेताज बादशहा. कॉमेडी सीन असो की कोणताही सिरीयस सीन असो, अशोक मामा तो अगदी मन लावून करतात आणि म्हणूनच प्रेक्षकांना तो सीन बघताना अगदी खराखुरा वाटतो. अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. या दोघांमध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे!

प्रेमाला वय, रंग, रूप नसते असं म्हणतात. या जोडीच्या बाबतीत ते अगदीच खरं ठरतं. वयात १८ वर्षांचं अंतर असूनही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आज त्यांचा संसार खूप सुखात सुरू आहे. अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ चा, तर निवेदिता यांचा जन्म ६ जून १९६५ चा. अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी भागात बालपण घालवलेल्या अशोक सराफ यांनी मुंबईच्या डी. जी. टी. विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

अशोक सराफ आणि निवेदिता यांची पहिली भेट ‘डार्लिंग डार्लिंग’ नाटकाच्या वेळी झाली. निवेदिता यांच्या वडीलांनी छोट्या निवेदिता यांची अशोक सराफ यांच्याबरोबर “ही माझी मुलगी” अशी ओळख करून दिली. १९७१ साली जेव्हा ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अशोक सराफ २४ वर्षांचे तर निवेदिता केवळ ६ वर्षांच्या होत्या.

अशोक मामांचे करिअर खूप छान सुरू होते. काही वर्षांनी निवेदिता यांनी देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या सुपरहिट चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले, मात्र त्यावेळी सेटवर त्यांचे कधी एकमेकांशी बोलणे झाले नाही.

त्यानंतर या दोघांनी ‘तू सौभाग्यवती हो’ या चित्रपटातदेखील एकत्र काम केले. मात्र त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली ती ‘धुमधडाका’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान.

दोघांनी १९९० साली लग्न केले. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव अनिकेत सराफ आहे. अनिकेत शेफ आहे. काय मग मित्रांनो, कशी वाटली अशोक सराफ आणि निवेदिता यांची प्रेमकहाणी? आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा.

You might also like