एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लग्न झाल्यापासून ऐश्वर्याचा एकच हट्ट! मात्र तोही पूर्ण करू शकत नाही अभिषेक…

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आणि ज्युनियर बच्चन अभिषेक या दोन सेलिब्रेटींनी २००७ मध्ये लग्न केले आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली. दोघांच्या लग्नाबद्दल बऱ्याच अ’फवा पसरल्या होत्या. ऐश्वर्या अभिषेकपेक्षा वयाने मोठी आहे.

मात्र दोघांनीही या अफवांना पूर्णविराम देत त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असून त्यामुळे ते दोघे लग्न करत असल्याचे सांगितले. अखेर २० एप्रिल २००७ ला दोघांचा शुभविवाह पार पडला. हे दोघेही सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांमधील एक आहेत. नोव्हेंबर २०११ मध्ये या दोघांना एक मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी आराध्या ठेवले.

अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र कुटुंबात राहतात. ऐश्वर्याचे सासू-सासरे म्हणजेच अभिषकचे आई-वडील जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे आपल्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर राहतात. आजकाल अशी एकत्र कुटुंबपद्धती फार कमी पाहायला मिळते. या सगळ्या कुटुंबाचे फोटो आपल्याला नेहमी सोशल मीडिया वर पाहायला मिळतात. अशा एकत्र कुटुंबात रहात असताना ऐश्वर्याने अभिषेककडे नेहमी एक हट्ट केला आहे. मात्र अभिषेकने तो हट्ट कधीच पुरवला नाही. असा काय हट्ट होता ऐश्वर्याचा?

प्रत्येक नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आपलं स्वतःचं स्वतंत्र घर असावं असं वाटतं. आपला राजा-राणीचा स्वतंत्र संसार असावा असं वाटतं. नैवन लग्न झाल्यानंतरचे ते मोरपंखी दिवस जोडप्याला एकमेकांबरोबर आणि फक्त एकमेकांबरोबरच घालवायचे असतात.

ऐश्वर्यालाही असं वाटलं होतं. ऐश्वर्याला आपल्या नवऱ्याबरोबर वेगळा संसार थाटायचा होता. त्यासाठी ती लग्न झाल्यापासून अभिषेकच्या मागेही लागली होती. दोघांनी एक फ्लॅट देखील खरेदी केला. मात्र अभिषेक काही या फ्लॅट वर राहायला तयार नाहीये.

२०१५ मध्ये या जोडीने मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये एक फ्लॅट खरेदी केला. ५५०० स्क्वेअर फूट च्या जागेत असलेल्या या फ्लॅटची किंमत जवळपास २१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ऐश्वर्याला आपल्या या फ्लॅटवर राहण्याची खूप इच्छा होती. मात्र अभिषेकला सध्या तरी आपल्या आईवडिलांबरोबर राहायचे आहे. त्यामुळे तो ऐश्वर्याच्या या हट्टाला दाद देत नाहीये.

ऐश्वर्या आणि अभिषेक जर या फ्लॅट वर राहायला आले, तर अभिनेत्री सोनम कपूर त्यांची शेजारी असेल. सोनमने देखील याच बिल्डींग मध्ये फ्लॅट घेतला आहे. तिचा हा फ्लॅट ७००० स्क्वेअर फूट वर असून त्याची किंमत सुमारे ३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

You might also like