एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या सुप्रसिद्ध खलनायकाची पत्नी आहे खूपच सुंदर! फोटो पाहून विश्वास बसणार नाही..

लोकांना जशी चित्रपटातल्या नायकाच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुकता असते, तशी काही खलनायकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्यात स्वारस्य असते. काही खलनायकांनी पडद्यावर आपल्या भूमिका इतक्या उत्तमरीतीने वठवलेल्या असतात की पाहणाऱ्याला त्यांचा राग यावा.

असेच एक खलनायक आहेत आशिष विद्यार्थी. आपण त्यांना अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांतून खलनायकाच्या भूमिका निभावताना पाहिले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या देखील भूमिका निभावल्या आहेत, पण त्यांच्या खलनायकाच्या भूमिका जास्त गाजल्या आहेत.

आशिष यांचा जन्म दिल्लीत झाला आहे. त्यांचे वडील मल्याळी तर आई बंगाली आहे. १९९० पर्यंत ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये शिकत होते. १९९२ ला ते मुंबईला आले. तेव्हा त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित ‘सरदार’ या चित्रपटात भूमिका केली होती.

१९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द्रोह काल’ या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून ‘नॅशनल फिल्म अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

आशिष विद्यार्थी यांनी आजपर्यंत अनेक हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातल्या बऱ्याच भूमिका या खलनायकाच्या असल्या तरी प्रेक्षकांना त्या मनापासून आवडल्या आहेत.

आशिष यांनी १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ या कन्नड चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटांबरोबरच आशिष यांनी २४- सीजन २ (२०१६), एम ओ एम- मिशन ओव्हर मार्स (२०१९) यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

आशिष विद्यार्थी यांच्या पत्नी राजोशी यादेखील अभिनेत्री आहेत. त्या दिसायला खूपच सुंदर आहेत. राजोशी बंगाली आहेत. त्यांनी ‘सती’, ‘डायमंड रिंग’ आणि ‘गुरु दक्षिणा’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

राजोशी यांनी अनेक मालिकांमध्ये देखील कामे केली आहेत. २०१४ मध्ये प्रसारीत झालेल्या ‘सुहानी सी एक लडकी’ या मालिकेतील त्यांची ‘प्रतिमा बिर्ला’ ही भूमिका खूप गाजली होती.

आशिष यांचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे. या दोघांना एक मुलगा आहे. आशिष आणि राजोशी या दोघांचेही आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. काय मग मंडळी, कशी वाटली आशिष आणि राजोशी यांची जोडी?

तुम्हाला या जोडीबद्दल आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल काय वाटते हे आम्हाला आवर्जून कळवा. त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका. आमचे लेख आवडल्यास ते नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा.

You might also like