एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अखेर आर्या आंबेकरचे मौन सुटले! प्रसिद्ध व्यक्तीला डे’ट करण्याबाबत केला खुलासा…

गोड दिसणारी, गोड हसणारी, गोड बोलणारी आणि गोड गाणारी अशी गायिका आर्या आंबेकरची ओळख आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते आहेत. अवघ्या ४-५ वर्षांची असल्यापासून आर्या गायनाचे प्रशिक्षण घेत आहे. बालवयात तिने झी मराठी वाहिनी वरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या गायनाच्या रिऍलिटी शो मध्ये भाग घेतला.

जरी ती या स्पर्धेची विजेती नसली तरी टॉप ५ मध्ये तिने स्थान पटकावले होते. या कार्यक्रमाने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. आपल्या गोड आवाजाने आणि विविध ढंगी गायकीने तिने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली होती.

त्यानंतर देखील तिने अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत प्रेक्षकांना आपल्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणे सुरूच ठेवले. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

आपल्या सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांना पुन्हा जिंकून घेतले. मोठ्या पडद्यावर ती खूप सहज वावरली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये अजूनच भर पडली. अनेक मालिकांसाठी तिने शीर्षकगीते देखील गायली आहेत.

सध्या ती झी मराठी वाहिनी वरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या रिऍलिटी शो ची परीक्षक म्हणून काम पहात आहे. मात्र अलीकडे ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ती सध्या एका प्रसिद्ध व्यक्तीला डे’ट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडिया च्या माध्यमातून होताना दिसत आहेत. नुकताच तिने या गोष्टीवर खु’लासा केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

आर्याने सांगितले, की अनेकांनी तिला याबाबत मेसेज देखील केले आहेत. आता तिला व्यक्त व्हायचं आहे, असे ती म्हणाली. तिने सांगितले, की “मी सोशल मीडिया वर अनेक दिवसांपासून ऍक्टिव्ह आहे. माझे फॉलोवर्स हे ऑरगॅनिक आहेत.

फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्यूब याना मी कधीही पैसे दिलेले नाहीत. फॉलोवर्स, सबस्क्रायबर्स किंवा व्ह्यूज विकत घेण्याच्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. मी त्याच्या विरोधात आहे आणि ते माझ्या नैतिकतेत बसत नाही.”

ती पुढे म्हणाली, “एखादं प्रमोशन किंवा गाण्याचा कार्यक्रम मी स्वतः मेल, मेसेज किंवा रिप्लाय करून हॅण्डल करत असते. मी एका प्रसिद्ध व्यक्तीला डे’ट करत असल्याच्या चर्चा खूप दिवसांपासून पाहतेय. पण मी सांगू इच्छिते, की ती व्यक्ती माझे मार्गदर्शक आहेत. मी नेहमीच त्यांचा आदर करते आणि पुढे देखील करत राहीन. मला त्यांचं नेहमीच कौतुक वाटत आलंय.”

You might also like