एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘रामायण’ मधील रावणाची भूमिका निभावणारे अरविंद त्रिवेदी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी झाले या कारणांमुळे नि’धन, या व्यक्तीने दिली माहिती…

एकामागून एक कलाकारांच्या जाण्याने बॉलिवूड इंडस्ट्री व टीव्ही इंडस्ट्री शोकांतिकेतून बाहेर येत नाही आहे. २०२० आणि २०२१ हे वर्ष सगळ्यांचा हालकीचे आणि दुःख दायी गेले आहे काही जणांनी आपल्या जवळचे नातेवाईक गमावले तर काहींनी फिल्म मधील आपल्या आवडत्या कलाकाराला त्याचा सिलसिला सुशांतसिंग राजपूत यांच्या मृ’त्यू नंतर जो सुरू झाला तो आजपर्यंत थांबला नाही. आताच आम्हाला एक आणखी बातमी मिळाली आहे ज्यामुळे टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत शोक केला जात आहे.

दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या रामायण या अत्यंत लोकप्रिय शोमध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री नि’धन झाले. अरविंद यांच्या नि’धनाने बॉलिवूड इंडस्ट्रीने एक अतिशय हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरविंद त्रिवेदीच्या भाच्याने त्याच्या काकांच्या मृ’त्यूची पुष्टी केली. या वर्षी अरविंद त्रिवेदी दीर्घकाळापासून आजारी होते माहितीनुसार त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे नि’धन झाले आहे. त्यांचे अंतिम संस्कार बुधवारी सकाळी मुंबईत होणार आहेत. अरविंद हे सुमारे महिनाभरापूर्वीच रुग्णालयातून घरी परतले होते. मंगळवारी रात्री ९:३० च्या सुमारास त्यांना हृद’यवि’काराचा झटका आला. यानंतर त्यांनी कांदिवली येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.

रामायण व्यतिरिक्त, या अभिनेत्याने ‘विक्रम आणि बेताल’ मध्येही चांगली कामगिरी केली होती, त्यांनी हिंदी आणि गुजरातीसह सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले. यात शंका नाही की अरविंद यांनी रावण म्हणून अशा प्रकारे काम केले की त्यांनी लोकांच्या हृदयात घर केले. अरविंद हे १९३८ मध्ये मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे जन्मले होते अरविंद यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत यश मिळवल्यानंतर गुजरात सरकारने दिलेल्या गुजराती चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सात पुरस्कार जिंकले होते. २००२ मध्ये, त्यांना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नाव घेण्यात आले. अरविंद त्रिवेदी यांनी २० जुलै २००२ ते १६ ऑक्टोबर २००३ पर्यंत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे प्रमुख म्हणून काम केले.

अरविंद त्रिवेदी यांच्या नि’धनाच्या बातमीने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. या शोशी संबंधित अनेक कलाकारांनी ही बातमी ऐकून अरविंद त्रिवेदी यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला. रामायणातील रामची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी यांच्यापासून महाभारत अभिनेता गजेंद्र चौहानपर्यंत कलाकारांनी अरविंद त्रिवेदी यांना सोशल मीडियावरील पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. आमच्या टीम कडून सुद्धा अरविंद यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

You might also like