एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अरुण कदम यांच्या लेकीचा साखरपुडा! थाटात साजरा झाला समारंभ…

सोनी मराठी वाहिनी वर सुरू असलेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम संबंध महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. यातले हरहुन्नरी कलाकार आपल्या टायमिंगने हास्याचे कारंजे फुलवताना दिसत आहेत.

या कार्यक्रमात बरेच कलाकार आले आणि गेले. मात्र काही कलाकार असे आहेत जे आधीपासून या कार्यक्रमाचा भाग आहेत आणि अजूनही ते निष्ठेने प्रेक्षकांना हसवण्याचा काम करत आहेत. अरुण कदम हा कलाकार त्यातलाच एक.

नुकताच अरुण कदम यांच्या एकुलत्या एका कन्येचा साखरपुडा पार पडला. अरुण कदम यांच्या मुलीचे नाव सुकन्या कदम आहे. नुकतेच तिने आपल्या साखरपुड्याची फोटो सोशल मीडिया वर शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vaishali Kadam (@mevaishali.kadam)

आपल्या एकुलत्या एक मुलीचा हा आनंद सोहळा अरुण कदम यांनी अगदी थाटात पार पाडल्याचे दिसत आहे. या सोहळ्याला अरुण कदम यांच्या सहकलाकारांनी हजेरी लावत चार चाँद लावले. या सहकलाकारांमध्ये सुप्रिया पाठारे आणि जयवंत वाडकर यांचा देखील सहभाग होता.

अरुण कदम यांची मुलगी सुकन्या एक ग्राफिक डिझायनर आहे. तिला नृत्याची विशेष आवड आहे. तिने भारतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. सुकन्याचा साखरपुडा सागर पोवळे याच्यासोबत झाला आहे. अरुण कदम यांचा होणारा एकुलता एक जावई सागर हा बि’अर इंडस्ट्री मध्ये काम करतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vaishali Kadam (@mevaishali.kadam)

सागर आपल्या क्षेत्रात ‘हेड ब्रुअर’ या पदाची जबाबदारी सांभाळत आहे. सुकन्या आणि सागर हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकतील, अशी माहिती सुकन्याच्या आईने म्हणजेच वैशाली कदम यांनी सोशल मीडिया वरून दिली आहे.

अभिनेते अरुण कदम आपल्या कोकणी बाजाने हास्य-कार्यक्रमांमध्ये धमाल उडवून देतात. विनोद करताना त्यांनी चेहऱ्यावर आणलेला निरागस आव भाव खाऊन जातो. अरुण कदम यांनी छोट्या पडद्यावर विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करत असताना अनेक चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

आपल्या मिश्किल अभिनयामुळे अरुण कदम यांच्या वाट्याला बऱ्याच वेळा विनोदी भूमिका आलेल्या पाहायला मिळतात. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसाख्या कार्यक्रमांमध्ये अरुण कदम आणि पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे यांची जोडी भल्याभल्याना पुरून उरली आहे.

हास्याचा विनोदवीर या भूमिकेतून अरुण कदम यांना एकदम बापाच्या भूमिकेत बघताना प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. अखेर कलाकारही एक माणूसच असतो. त्यांच्याही आयुष्यात जसे दुःखाचे क्षण येतात, तसे आनंदाचे क्षणही येत असतात. अरुण कदम यांच्या आयुष्यात आलेल्या या आनंदाच्या क्षणात प्रेक्षक मनापासून सामील आहेत. सुकन्याला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!

You might also like