एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अरुण कदम यांची पत्नी आहे इतकी सुंदर! फोटो पाहून विश्वास बसणार नाही…

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मधून संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण कदम. पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बरोबर अरुण कदम या कार्यक्रमात धमाल आणतात. आपल्या आगरी भाषेमुळे ते या कार्यक्रमात फार प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या आगरी भाषेतील विनोदांमुळे उभा महाराष्ट्र खळखळून हसत असतो. या कार्यक्रमात अनेक कलाकार आले आणि गेले, मात्र अरुण कदम आणि पॅडी कांबळेची जोडी सर्वांना पुरून उरली आहे.

दोन दशकांपासून अधिक काळ अरुण कदम इंडस्ट्री मध्ये काम करत आहेत. अरुण कदम यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमातून लोकांना त्यांच्या विनोदाच्या विविध बाजू बघायला मिळाल्या.

त्यांचे आगरी भाषेवर असलेले प्रभुत्व त्यांना एक वेगळी ओळख मिळवून देतं. त्यांच्या तोंडून ही भाषा ऐकणं यात एक वेगळीच गंमत आहे. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ नंतर अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या या आगळ्यावेगळ्या आगरी भाषेची कमाल दाखवून दिली आहे.

आपल्या या विनोदाची आणि अभिनयाची जादू त्यांनी अनेक चित्रपटांतून दाखवून दिली. ओवाळते भाऊराया, जलसा, शिनमा, जस्ट गम्मत, घंटा, सासूबाई गेल्या चोरीला, टाटा बिर्ला आणि लैला, थोरली बहीण यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अरुण कदम यांनी काम केले आहे.

त्यांनी मराठी बरोबरच अनेक हिंदी चित्रपटातही काम केले आहे, हे खूप कमी जणांना माहीत आहे. बायपास (२००९), दिल तो बच्चा है जी (२०११), सनी देओलचा काफिला अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

तुम्हाला माहीत आहे का, की अरुण कदम यांची पत्नी खूपच सुंदर दिसते? अरुण कदम यांच्या पत्नीचे नाव वैशाली कदम आहे. त्या दिसायला खूपच सुंदर आहेत. त्या नेहमी सोशल मीडिया वर काही ना काही शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडिया वर शेअर केलेल्या फोटोंमहडून दिसून येतं की त्या किती आकर्षक दिसतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vaishali Kadam (@mevaishali.kadam)

वैशाली आणि अरुण कदम यांना सुकन्या नावाची एक मुलगी आहे. सुकन्या पेशाने ग्राफिक डिझायनर आहे. नुकताच तिचा साखरपुडा झाला आहे. सुकन्याचा होणारा नवरा बिअर क्षेत्रात काम करतो. तो ‘हेड ब्रुअर’ आहे. या दोघांचे लवकरच लग्न होणार असल्याची बातमी वैशाली यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर दिली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vaishali Kadam (@mevaishali.kadam)

You might also like