एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘हा’ आहे अरुण गवळी यांचा जावई! बिग बॉस ३ यामध्ये आहे स्पर्धक…

कलर्स मराठी वर ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ ची धमाकेदार सुरुवात झाली आणि यातल्या स्पर्धकांबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली गेली. कलाकारांच्या रील लाईफ बद्दल बरीच माहिती असणारे प्रेक्षक त्यांच्या रिअल लाईफ बद्दल मात्र बरेच अनभिज्ञ असतात. बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धकाचे खरे रूप पाहायला मिळते. तशा तर या घरात अनेक गोष्टी घडत असतात.

कधी कोणाचे एकमेकांना बघता क्षणीच भां’ड’ण होते, तर कुणाला आधी झालेली भांडणं आठवतात. काही लगेच मित्र बनून जातात. तर कधी कधी कुणाला इतरांशी कसे वागायचे हेच कळत नाही. स्पर्धकांची ही सगळी रूपं बिग बॉसच्या घरात बघायला मिळत असली तरी या कलाकारांच्या पार्श्वभूमीबद्दल फार कमी लोकांना माहिती असते.

‘बिग बॉस मराठी सिझन ३’ मधील अशाच एका स्पर्धकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या स्पर्धकाचे नाव आहे अक्षय वाघमारे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अक्षय हा अरुण गवळी यांचा जावई आहे. २०२० मध्ये त्याचे आणि अरुण गवळी यांची मुलगी योगिता यांचे लग्न झाले.

instagram.com/akshayswaghmare

लॉ’कडा’ऊन असल्याने केवळ घरच्या मंडळींच्या उपस्थितीतच हे लग्न पार पडले. विशेष म्हणजे हे लग्न दगडी चाळीत झाले आहे. यावर्षी दोघांच्या आयुष्यात त्यांच्या गोड मुलीने प्रवेश केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून अक्षयनेच ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

source:mymahanagar

अक्षयचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले असता अजून एक गोष्ट लक्षात येते, की अक्षयला फिटनेसची भयानक आवड आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो हे त्याच्या वर्कआऊटचे आहेत. आपल्या फिटनेसकडे तो अजिबात दुर्लक्ष करत नाही. एक्सरसाईज करून त्याने आपले पिळदार शरीर कमावले आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने सोशल मीडिया वर आपले वर्कआऊटचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

instagram.com/akshayswaghmare

अक्षयने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. फत्तेशिकस्त, बस स्टॉप, दोस्तीगिरी, बेधडक हे त्याचे काही गाजलेले चित्रपट. ‘ती फुलराणी’ या मालिकेतही त्याने काम केलेले आहे. अक्षयला अभिनयाचा वारसा त्याच्या घरातूनच मिळाला आहे. खूप कमी जणांना ही गोष्ट माहीत आहे, की अक्षय वाघमारे सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांचा नातू आहे. दादा कोंडके यांनी आपल्या चित्रपटांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या चित्रपटांचा स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग होता.

You might also like