एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मलायकाच्या प्रेमात पुरता बुडाला अर्जुन, प्रेमासाठी खर्च केले तब्बल २३ कोटी..!

मित्रहो प्रेम माणसाला इतकं गुंतवून ठेवते की त्यातून आयुष्यभर सुटका होणे कठीण असते, मग ते प्रेम यशस्वी होवो अथवा ते अयशस्वी होवो. एकदा प्रेम झाले की बाकी कोणत्याच गोष्टीचे मूल्य राहत नाही, माणूस प्रेमाच्या प्रवाहात अलगद वाहत जातो. प्रेम हे कधी दिसून येत नाही, आपल्याला ते अनुभवावे लागते. याचा अनुभव घेणारी या जगात हजारो, लाखो लोक आहेत.

अनेकांची प्रेमकथा लोकप्रिय झाली आहे, तर काहींची प्रेमकथा अमर झाली आहे. कलाक्षेत्रातील चित्रपटाद्वारे अनेक नवनवीन प्रेमकथा आपल्याला पाहायला मिळतात, पण या काल्पनिक प्रेमकथेत भूमिका निभावताना अनेक कलाकार आपली खरीखुरी प्रेमकथा बनवतात जी खूप लोकप्रिय होते.

बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकार प्रेमात रंगले आहेत, आणि त्यांचा हा प्रेमाचा रंग सोशल मीडियावर चांगलाच उधळला जात आहे. नेहमी कलाकारांच्या प्रेमाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु असतात, त्यांच्या या चर्चेत अर्जुन आणि मलायका आघाडीवर आहेत. त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते, बॉलिवूड मधील हे एक बिनधास्त कपल म्हणून ओळखले जाते.

ते दोघे नेहमीच एकमेकांसोबत फिरताना दिसतात, नेहमी एकत्र असतात. अर्जुन आणि मलायका एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात, ते एकमेकांसाठी काहीही करू शकतात. त्याचेच उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर अर्जुनची होत असलेली चर्चा.

अर्जुन हा बॉलिवूड मधील एक हँडसम, तरुण अभिनेता आहे, अनेक तरुणी त्याच्या चाहत्या आहेत. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटला अनेकांनी फॉलो केले आहे. अर्जुन जरी अभिनेता असला तरीही तो चित्रपटाहून जास्त मलायकावर असलेल्या त्याच्या प्रेमामुळे चर्चेत असतो आणि आता पुन्हा एकदा अर्जुन नव्याने चर्चेचा विषय बनला आहे.

अर्जुन मलायकाच्या प्रेमात इतका बुडाला आहे की त्याला आता तिच्यापासून दूर राहणे कठीण जात आहे, म्हणून की काय त्याने तीच्या शेजारीच नवा सी फेसिंग व्हीला खरेदी केला आहे. हा व्हीला खूप सुंदर असून खुप महाग देखील आहे. जर कोणी सामान्य माणसाने या व्हीलाची किंमत ऐकली तर त्याला असेच वाटेल की प्रेमासाठी लोक काहीही करतात.

अर्जुनने खरेदी केलेल्या या व्हीलाची किंमत आहे २१ ते २३ कोटी, हा व्हीला २६ व्या मजल्यावर आहे. खरच माणूस प्रेमात पडला की तो काहीही करू शकतो, प्रेम त्याला प्रत्येक वेळी नव्याने गुंतवत असते त्यामुळे अर्जुनची देखील काहीशी अशीच स्थिती झाली आहे, याआधी अर्जुन आणि मलायका फक्त भेटलेले दिसत होते मात्र आता दोघे पक्के शेजारी सुद्धा झाले आहेत.

हे दोघे प्रेमात तर पडलेत पण लग्नबेडीत कधी अडकणार अशी सर्व चाहते चर्चा करत आहेत. बॉलिवूड मध्ये हे दोघे कलाकार म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत, अर्जुनचे अनेक चित्रपट रसिकांना अडवतात.

त्यामुळे अर्जुनची कमाई भरपूर आहे, एका महिन्याला तो जवळपास एक कोटी पेक्षा जास्त कमावतो. एका चित्रपटासाठी अर्जुन ५ ते ७ कोटी घेतो आणि एका जाहिरातीसाठी तो १ कोटी घेतो, वर्षाची कमाई ८ ते १० कोटी इतकी आहे.

मलायका देखील बॉलिवूड मध्ये आघाडीची अभिनेत्री आहे, तीची संपत्ती पाहिली तर ती एकूण १०० कोटींची मालकीण आहे आणि अर्जुन ८८ कोटींचा मालक आहे. अरबाज खान सोबत घटस्फोट झाल्यावर मलायका पुन्हा अर्जुनच्या प्रेमात पडली आहे, आणि तीने आपले अर्जुन सोबत असलेले नाते पूर्णपणे ऑफिशियल केले आहे.

या दोघांच्या जोडीला चाहते खूप पसंत करतात, सोशल मीडियावर हे दोघेही नेहमीच चर्चेत असतात. या दोघांना भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. दोघांनी एकमेकांना असेच जपावे, नेहमी प्रेम करावे ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील जरूर करा.

You might also like