एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेतील हा अभिनेता झाला बाबा! शेअर केला गोड मुलीचा व्हिडिओ…

जेवढे चित्रपटातले कलाकार लोकप्रिय असतात, तेवढीच लोकप्रियता मालिकांमधल्या कलाकारांनाही मिळत असते. मालिकेतल्या प्रमुख कलाकारांना लोक जेवढे फॉलो करतात, तेवढीच प्रसिद्धी मालिकेतल्या सहाय्यक कलाकारांनाही मिळत असते. आजकाल कलाकार केवळ मालिकांमध्ये अभिनय करत नाहीत, तर आपले काम जास्त लोकांपर्यंत पोचावे म्हणून सोशल मीडिया वरही सक्रीय असतात. आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत हे लोक आपल्या चाहत्यांच्या संपर्कात रहात असतात.

काही मालिकांमध्ये अनेक पात्रे असतात. यातली बरीच काही काळासाठीच पडद्यावर दिसतात. पण आपल्या लक्षणीय अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात ही पात्रे आणि ती साकारणारे कलाकार घर करून राहतात. असेच एक पात्र आहे ‘देवमाणूस’ या मालिकेतले. झी मराठी वाहिनीवर रात्री साडेदहाला प्रसारीत होणारी ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. यातली लक्षात राहणारी पात्रे, त्याने अनोखे संवाद आणि ते साकारणारे हरहुन्नरी कलाकार ही या मालिकेच्या यशामागची कारणे आहेत. ‘देवमाणूस’ मालिकेतील इन्स्पेक्टर रणजित हे असंच एक पात्र.

‘देवमाणूस’ मध्ये डॉ. अजितकुमारला अ’ट’क करण्यासाठी एसीपी दिव्या सिंग या व्यक्तिरेखेची एन्ट्री करण्यात आली होती. मध्यंतरी मालिकेतून हे पात्र गायब झाले होते. त्यामुळे या पात्राच्या जागी इन्स्पेक्टर रणजित या नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री करण्यात आली. मालिकेत इन्स्पेक्टर रणजित डॉ. अजितकुमार उर्फ देवीसिंग चा सतत पिच्छा पुरवताना दिसत होता. डॉ. अजितकुमारला अ’ट’क करण्यासाठी पोलिसांची चाललेली धडपड या मालिकेत दिसून येते. मात्र आपल्या हुशारीने आणि पुराव्यांअभावी अजितकुमार नेहमीच पोलिसांच्या कचाट्यातून निसटलेला पाहायला मिळतो.

इन्स्पेक्टर रणजित डॉ. अजितकुमारची नेहमीच पोलखोल करत असतो. त्याच्या या त्रासातून वाचण्यासाठी डॉ. अजितकुमार आणि त्याची साथीदार डिंपल कट रचतात. जसा इतर त्रास देणाऱ्या व्यक्तींना अजितकुमार आपल्या मार्गातून कायमचा बाजूला करतो, तसाच त्याने इन्स्पेक्टर रणजितचाही काटा काढला. अजितकुमार आणि डिंपलने मिळून इन्स्पेक्टर रणजितचा खू’न केल्यानंतर ही व्यक्तिरेखा मालिकेतून गायब झाली होती. त्यामुळे इन्स्पेक्टर रणजितचे चाहते त्याची खूपच आठवण काढत होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun kusumbe (@arjunkusumbe_official)

इन्स्पेक्टर रणजितची भूमिका केली होती अभिनेता अर्जुन कुसुंबे याने. नुकताच त्याने सोशल मीडिया वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक लहान बाळ दिसत आहे. हे बाळ एक गोड मुलगी असून ती अर्जुनची मुलगी आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने आपण बाप झाल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. चाहत्यांनी त्याच्या या पोस्ट वर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. आमच्या टीमतर्फेही अर्जुन कुसुंबेचे हार्दिक अभिनंदन!

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun kusumbe (@arjunkusumbe_official)

You might also like