एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नवरात्री निमित्त अपूर्वा नेमळेकरने धारण केले आई अंबाबाईचे रूप! पाहा फोटो…

नवरात्रीच्या मंगलमय उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरवर्षीसारखा धूमधडाक्यात नसला, तरी प्रत्येकाने आपल्या परीने जमेल तसा हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. जगतजननी मानवजातीवर आलेले कोरोनाचे संकट दूर करेल, अशी सगळ्यांना आशा आहे. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव. स्त्री मध्ये लपलेल्या शक्तीचा उत्सव. जगातील सगळ्याच स्त्रिया या शक्तीचं, देवीचं रूप मानल्या जातात. त्यांच्या अस्तित्वाचा, मांगल्याचा हा उत्सव. हिंदू पुराणात अशा अनेक स्त्रिया आढळतात ज्यांची शक्ती म्हणून पूजा केली जाते. यातील अनेक देवीची रूपे आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

या देवींची माहिती बऱ्याचदा लोकांना नसते. नवरात्रीच्या निमित्ताने ती मिळताना दिसते. असाच एक प्रयत्न केला आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने. नवरात्री निमित्त तिने देवीची वेगवेगळी रूपे सादर केली आहेत. पहिल्या दिवशी तिने कोल्हापूरच्या आई अंबाबाईचे रूप धारण केले आहे. यावर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग पिवळा होता. त्याच रंगाची साडी परिधान करत अपूर्वाने हे फोटोशूट केलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

डोक्यावर मुकुट, कपाळावर मळवट, मळवटावर ठसठशीत लाल कुंकू, नाकात नथ, गळ्यात गजरा आणि कापसाचे वस्त्र, सोन्याचे दागिने असे तिचे रूप आहे. कोल्हापूरचे श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर हे भारतातील ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. दरवर्षी या ठिकाणी अनेक भाविक येऊन आई अंबाबाईच्या चरणी आपले मस्तक टेकवून जातात. येथे येणारे भाविक लहान मुलांप्रमाणे आपल्या चिंता आई अंबाबाईवर सोडून निर्धास्त होतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

अशा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रूपातील आपले हे फोटो अपूर्वाने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. अपूर्वा सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेतून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिच्या या भूमिकेने तिला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली आहे. तिचा या मालिकेतील लूक हा बराच बिनधास्त आणि बऱ्याचदा सेक्सी असतो. प्रेक्षकांना नेहमीच तिचे हे ‘शेवंता’ चे पात्र आवडत आले आहे.

त्यामानाने तिने साकारलेले देवीचे हे रूप खूपच सोज्वळ आणि सात्विक आहे. तिच्या या फोटोंमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकांना तिचा हा लूक खूप आवडून गेला आहे. अनेकांनी तिच्या या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. आपले हे फोटो शेअर करत तिने त्यावर “मी व माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!” अशी कॅप्शनही टाकली आहे.

You might also like