एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अनुष्का शेट्टी अडकणार लग्नबंधनात! प्रभास नाही तर या क्रिकेटरचे आले नाव समोर..

‘बाहुबली’ चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. बाहुबली, देवसेना, भल्लालदेव, शिवगामी, कटप्पा या त्या व्यक्तिरेखा आहेत. यातील देवसेनेची भूमिका साकारली होती दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी.

आपल्या अप्रतिम अभिनयाने तिने बाणेदार देवसेना खूप उत्तम साकारली होती. ‘बाहुबली’ चित्रपटातील अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांची जोडी खूप गाजली. जशी या जोडीला ऑनस्क्रीन प्रसिद्धी मिळाली, तेवढेच ते चर्चेत राहिले ते त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे.

‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनुष्का आणि प्रभासच्या नात्याची बरीच चर्चा होत राहिली. मात्र आता हे नाते उरले नसल्याचे चिन्ह आहे. अनुष्का या नात्यातून बाहेर पडून बरीच पुढे गेली असल्याची चर्चा आहे.

सध्या ती एका क्रिकेटरच्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे. हा क्रिकेटर कुणी दाक्षिणात्य नसून तो उत्तर भारतीय असल्याचे बोलले जाते. या क्रिकेटरचे नाव अजून गुलदस्त्यात असले तरी यांच्या अ’फे’यरच्या चर्चा होताना दिसत आहेत.

काही जणांच्या म्हणण्यानुसार या दोघांचा साखरपुडा झाला आहे. काहीजण या दोघांच्या लग्नाची देखील तयारी सुरू असल्याचे बोलत आहेत. त्यामुळे आता अनुष्का शेट्टी लग्नबंधनात अडकणार का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

याउलट काही संकेतस्थळांनी अनुष्का शेट्टी एका दिग्दर्शकाशी लग्न करणार असल्याचे म्हटले आहे. प्रकाश कोवेलामुदी असे या दिग्दर्शकाचे नाव असल्याचे कळते. प्रकाशचे वडील राघवेंद्र राव हेदेखील तेलगू चित्रपटसृष्टीतले नावाजलेले दिग्दर्शक आहेत.

प्रकाशने २००४ मध्ये आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीची सुरुवात केली. त्याचा ‘साइज झिरो’ (२०१५) हा चित्रपट तमिळ आणि तेलगू अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या दोघांच्या लग्नाच्या बातम्या पसरत असल्या तरी अनुष्का किंवा प्रकाश या दोघांपैकी कुणीही या वृत्ताला अजून दुजोरा दिलेला नाहीये.

अनुष्का शेट्टीच्या लग्नाबद्दल येणाऱ्या या बातम्यांनी प्रेक्षकांना गोंधळात टाकले आहे. अनुष्काचे चाहते तिच्या लग्नाच्या बातमीने खूष झाले असले तरी तिचा होणारा नवरा नक्की कोण असणार याबात अजूनही संभ्रमच आहे.

लवकरात लवकर हा गोंधळ संपू दे आणि अनुष्काच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव समजू दे, अशीच तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. जो कुणी अनुष्का शेट्टी या गुणी अभिनेत्रीचा पती होईल तो अर्थातच खूप नशीबवान असेल. मात्र अनुष्काच्या लग्नाच्या या बातम्यांमुळे लवकरच तिच्या लग्नाची गोड बातमी तिच्या चाहत्यांना मिळेल, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.

You might also like