एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एक चुकीचा निर्णय आणि संपवले आपले करिअर, या गायकीने लता मंगेशकरांना हि टाकले होते मागे..

सिनेसृष्टी मध्ये कधी कोणते निर्णय अंगलट येतील हे सांगता येत नाही. एक चुकीचा निर्णय घेतला जातो आणि लोकांच्या आयुष्याची वाताहत होते. असेच घडले एका प्रसिद्ध गायिकेच्या बाबतीत. त्या गायिकेचं नाव आहे अनुराधा पौडवाल.

या गायिकेने असा कोणता निर्णय घेतला की त्यामुळे तिच्या यशस्वी करिअर ला खीळ बसली? आता ही गायिका सिनेसृष्टीत कुठेच दिसत नाही. असं काय घडलं की या गायिकेचं करिअरच संपून गेलं?

२७ ऑक्टोबर १९५२ ला जन्माला आलेल्या गायिका अनुराधा पौडवाल ६८ वर्षांच्या आहेत. मात्र सध्या त्या कोणतेही गाणे गाताना दिसत नाहीत. ८० च्या दशकात या गायिकेने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन करून खूप प्रसिद्धी मिळवली होती.

त्याच दरम्यान लता मंगेशकर, आशा भोसले, अलका याज्ञीक या गायिका आपल्या आवाजांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. पण या आवाजांशी बरोबरी करत अनुराधा पौडवाल यांनी सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले होते.

अनुराधा पौडवाल यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, जयदेव यांसारख्या दिग्गज संगीतकारांबरोबर काम केले. यादरम्यान त्यांचे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याशी वाद झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. त्यामुळे त्या इतर संगीतकारांच्या रडारवर आल्या. अशावेळी गुलशन कुमार यांची टी सिरीज ही म्युझिक कंपनी त्यांच्या मदतीला धावून आली.

टी सिरीज हे सिनेसृष्टीतलं खूप गाजलेलं नाव आहे. अनुराधा पौडवाल यांनी टी इरीज साठी गायला सुरुवात केली. ‘आशिकी’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘बेटा’ या चित्रपटांसाठी त्यांना सलग फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. त्या गुलशनकुमार यांच्या आवडत्या गायिका बनल्या. गुलशनकुमार सर्वत्र अनुराधा पौडवाल यांचे कौतुक करू लागले. त्यामुळे या दोघांचे अ’फे’यर असल्याच्या बातम्या पसरू लागल्या.

संगीतकार ओ पी नय्यर यांनी अनुराधा पौडवाल यांचा आवाज ऐकून ‘लता मंगेशकर यांचे युग संपले आहे, अनुरोधाने त्यांची जागा घेतली आहे’ असे त्यांचे कौतुक केले होते. गुलशनकुमार यांनी अनुराधा पौडवाल यांना दुसरी लता मंगेशकर बनवण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनी त्यावर काम करणेही सुरू केले.

मात्र एक दिवस अनुराधा पौडवाल यांनी त्या केवळ टी सिरीज साठी गाणार असल्याचे जाहीर केले. सर्वांनाच यामुळे आश्चर्याचा धक्का बसला.

पण त्यांच्या या निर्णयामुळे त्यांनी स्वतःच्याच करिअर ला खीळ बसवली. टी सिरीज व्यतिरिक्त बाकी गाणी इतर गायिकांना मिळू लागली. त्यामुळे अनुराधा पौडवाल यांना बाकी प्रकारची गाणी मिळणे बंद झाले.

त्यांनी पुढे केवळ भजन आणि आरती गायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीला हा खूप मोठा धक्का होता. गुलशनकुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांनी गाणेही सोडले.

You might also like