एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अंकुश चौधरीच्या पत्नीला ओळखले का? ती देखील आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री..

अंकुश चौधरी हे नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभी राहते त्याची स्टायलिश छबी. मराठीतला स्टायलिश हिरो म्हणून ओळख असलेला अंकुश सध्याच्या घडीचा मराठीतला एक आघाडीचा अभिनेता आहे.

सावरखेड एक गाव (२००४), चेकमेट (२००८), उलाढाल (२००८), गैर (२००९), रिंगा रिंगा (२०१०), लालबाग परळ (२०१०), नो एन्ट्री: पुढे धोका आहे (२०१२), दुनियादारी (२०१३), पोर बाजार (२०१४), क्लासमेट्स (२०१५), डबल सीट (२०१५), दगडी चाळ (२०१५), गुरू (२०१६), ती सध्या काय करते (२०१७) , देवा (२०१७), ट्रिपल सीट (२०१९) यांसारखे त्याने भूमिका केलेले चित्रपट प्रचंड हिट ठरले.

१९९५ मध्ये त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अंकुशने काही मालिकांमध्येही काम केले आहे. आभाळमाया (१९९९), हसा चकटफू (२०००), बेधुंद मनाची लहर (२००२) या त्या मालिका आहेत. अभिनेता असण्याबरोबरच अंकुश एक उत्तम पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे.

अंकुश चौधरीची अनेक नाटके देखील बरीच गाजली आहेत. अशा या गुणी अभिनेत्याची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे. दीपा परब असं अंकुशच्या पत्नीचं नाव आहे. दीपा परब हे मराठी चित्रपटसृष्टीतलं एक गाजलेलं नाव आहे. २००७ मध्ये या दोघांचं लग्न झालं.

दीपाने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने बऱ्याच जाहिराती तसेच नाटकांमधूनही कामे केली आहेत. सध्या ती स्टार प्लस वाहिनीवरील ‘शौर्य और अनोखी की कहानी’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.

Third party image reference

तिने झी टीव्ही वरील ‘छोटी माँ’ तसेच सोनी वाहिनीवरील ‘थोडी ख़ुशी थोडे गम’ या मालिकांमध्ये काम केले आहे. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर मराठा बटालियन (२००२), चकवा (२००४), लगन- द डेडीकेशन (२००५), क्षण (२००६), कथा तिच्या लग्नाची (२००९), मुलगा (२०१०) यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.

Third party image reference

‘ऑल द बेस्ट’ सारख्या सुपरहिट नाटकातही तिने काम केले आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बॉम्बे मेरी जान’ हे दीपाचे पहिले व्यावसायिक नाटक होते.

खरंतर मराठी चित्रपटसृष्टीत अंकुश दीपा एक क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. दोघांचीही जोडी एकदम शोभून दिसते. काय मग मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही सुपरहिट जोडी? तुम्हाला ही जोडी आवडली असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तसेच आमचा हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका.

You might also like