एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मलायका आणि पुतण्या अर्जुन कपूरच्या नात्यावर अनिल कपूर यांचे पहिल्यांदाच वक्तव्य..

१९९८ मध्ये अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी आपली लग्नगाठ बांधली. ही जोडी लवकरच बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडी बनली. अनेक कार्यक्रमांना दोघे जोडीने हजेरी लावू लागले. बॉलिवूड मधील आदर्श जोडप्यांमध्ये या दोघांची गणना होऊ लागली.

अनेक नवी जोडपी या जोडीकडे एक आदर्श म्हणून पाहू लागली. दोघांमधील प्रेम या दोघांनी वारंवार खुलेआम व्यक्त केले आहे. त्यामुळे २०१७ मध्ये जेव्हा या दोघांनी घटस्फोट घेतला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा ध’क्का बसला. २०१६ पासूनच हे जोडपे वेगळे रहात असल्याचे नंतर समजले.

हा ध’क्का पचवून होत नाही तोपर्यंत मलायकाच्या चाहत्यांना अजून एक ध’क्का बसला. मलायकाचा घट’स्फो’ट झाल्यानंतर तिला आणि अर्जुन कपूरला बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहिले गेले. त्यावेळी या दोघांच्या रि’ले’श’न’शिपच्या चर्चा प्रसार माध्यमांमध्ये सुरू झाल्या होत्या.

मलायकाने २०१९ मध्ये अभिनेता अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी अर्जुन आणि मलायका रिले’श’नशिप मध्ये असल्याची बातमी चाहत्यांना दिली. मलायका अरोरा सध्या ४७ वर्षांची आहे, तर अर्जुन कपूर ३६ वर्षांचा आहे.

या दोघांच्या वयात जवळपास अकरा वर्षांचा फरक आहे. त्यामुळे मलायका आणि अर्जुन दोघांनाही सोशल मीडिया वर बरंच ट्रो’ल केलं गेलं. मात्र दोघेही अजूनपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम असून लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा एकमेकांसोबत वेळ घालवणे जास्त पसंत करतात.

अशावेळी मलायका आणि अर्जुनच्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्या या नात्याबद्दल काय वाटते, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागून राहिली होती. एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर हे नात्याने अर्जुन कपूरचे काका लागतात. त्यांनादेखील या नात्याबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यांनी दिलेल्या समंजस उत्तराने सर्वच चकित झाले.

नुकत्याच एका चॅट शो ला अनिल कपूर यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा त्यांना त्यांचा पुतण्या अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या डे’टीं’ग बद्दल काय वाटतं, असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी खूप विचारपूर्वक उत्तर दिलं. ते म्हणाले, की हा त्या दोघांचा खासगी प्रश्न आहे. त्यामुळे मी यावर कोणतेच वक्तव्य करू इच्छित नाही.

मी अर्जुनला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. त्याला ज्या गोष्टींनी आनंद होतो, त्या गोष्टीत मीही खूष आहे. एखाद्याला जर त्याच्या आवडत्या गोष्टीतून आनंद मिळत असेल, तर आपणही त्याच्या आनंदात आनंद मानून जगलं पाहिजे, अशी आमच्या परिवारातील सदस्यांची धारणा आहे.

You might also like