एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘शोले’ फेम गब्बरची मुलगी झाले आता मोठी, सध्या करत आहे हे काम ऐकून विश्वास बसणार नाही..

“कितने आदमी थे” हा डायलॉग आपण ऐकलाच असेल. त्याचबरोबर हा डायलॉग आपल्या दमदार आवाजात आणि दिमाखात ऐकवणारा गब्बरही तुमच्या लक्षात असेल. तर याच गब्बरच्या वैयक्तिक आयुष्यातली एक मजेशीर गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. बॉलीवूडच्या चाहत्यांना नेहमीच कलाकारांच्या आयुष्यातल्या चढ उतारांचा आढावा घ्यायला आवडतो.

बॉलीवूडमधला एक अत्यंत महत्त्वाचा तसेच सुप्रसिद्ध चित्रपट म्हणजे शोले. या चित्रपटाने चित्रपटसृष्टीचा इतिहासच बदलून टाकला. बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. अनेक नवे ट्रेंड आणले. अभिनय, दिग्दर्शन, लेखन, संगीत, स्पेशल इफेक्ट्स या सगळ्याच चित्रपटाच्या अंगांना योग्य न्याय देत हा चित्रपट मैलाचा दगड ठरला.

या चित्रपटातले सर्वच पात्र आजही चाहत्यांच्या तंतोतंत लक्षात आहेत. या चित्रपटातले डायलॉग तर म्हणींसारखे प्रचलित झाले आहेत. “सो जाओ बेटा वर्ना गब्बर आ जाएगा” म्हटल्याबरोबर आपल्याला गब्बर आठवतो. “ये हाथ मुझे दे दो ठाकूर” हा देखिल डायलॉग सुप्रसिद्ध आहे. तो ही गब्बर या पात्राच्याच तोंडून आलेला आहे.

या चित्रपटात गब्बरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव अमजद खान असे आहे. अमजद यांनी अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा अविष्कार दाखवला आहे. पण त्यांची गब्बर ही भूमिका प्रेक्षकांच्या आजवर तशीच लक्षात राहिली आहे आणि यापुढेही राहिल. अमजद खान हे सध्या काय करत आहेत आणि त्यांचा परिवार कसा आहे याबद्दल तुम्हाला उत्सुकता लागली असेल.

तर अमजद खान यांचा परिवार एका पत्नीसह दोन मुले व एक मुलगी आहे. अमजद खान यांच्या मुलीचे नाव आहलम खान असे आहे. अहलम खान चा विवाह नुकताच हिप हिप हुर्रे फेम जफर करांचीवाला याच्यासोबत झाला आहे. अहलम खान ही दिसायला अतिशय सुंदर आहे.

तिच्यासमोर भल्या भल्या अभिनेत्र्या फिक्या पडव्यात इतकी तिच्या रुपात नजाकत भरलेली आहे. तिच्या खालील फोटोमधून तुम्ही तिला पाहू शकता. पाहिल्यावरती तुम्हालाही तिच्या सौंदर्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.

बऱ्याच अभिनेत्यांचे आणि अभिनेत्रींचे अपत्य हे सिनेमात येण्यासाठी धडपडत असतात. घरचा सपोर्ट, योग्य जडघडण आणि पैसा असल्याने त्यांना थोड्याशा धडपडीवर कामे मिळतातसुद्धा. काहीजण खूप पुढेही जातात. पण काहीजण मात्र टॅलेंट असूनही या लाईमलाईटच्या प्रेमात न पडता सच्चा कलेसाठी झगडताना दिसून येतात.

याचेच उदाहरण म्हणजे अहलम आहे. अलहम ही सध्या थेटर करते आहे. तिने अनेक नाटकांमधून काम केले आहे. आतासुद्धा ती रंगमंचाची मनोभावे सेवा करते आहे. खरेतर तिचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तिला या क्षेत्रात खूप यश मिळो.

You might also like