एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अमाप संपत्तीचे मालक असलेल्या अमिताभ बच्चन यांचा हा लहान भाऊ मात्र जगतोय हलाखीचे जीवन!

अमिताभ बच्चन हे बॉलिवूड मधील एक मोठं प्रस्थ आहे. आपला विशेष आवाज, संवाद बोलण्याची पद्धत, कोणतीही भूमिका सहजपणे निभावून नेण्याची हातोटी यामुळे त्यांना तोडीस तोड टक्कर देणारे फार कमी कलाकार आहेत. केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात अमिताभ यांचे चाहते आहेत. लवकरच ते वयाची ८० वर्षे पूर्ण करतील. तरीही ते इंडस्ट्री मधले सगळ्यात बिझी स्टार आहेत. या वयातदेखील त्यांची ऊर्जा बघून लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.

अमिताभ यांनी आपल्या फिल्मी करिअर ची सुरुवात ‘सात हिंदुस्तानी’ (१९६९) या चित्रपटातून केली. त्यांनी आजवर जवळपास २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कामामुळे त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच पण सोबतच अमाप पैसाही मिळाला. त्यांच्या पत्नी जया, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या हेदेखील चित्रपटसृष्टीत काम करत असून त्यांनीही अमाप प्रसिद्धी आणि पैसा कमावला आहे.

मात्र बच्चन कुटुंबातील एक व्यक्ती अशी आहे जी या प्रसिद्धी आणि पैशांपासून लांब आहे. इतक्या प्रतिष्ठीत कुटुंबाशी संबंध असूनही या व्यक्तीचे कुटुंब हलाखीचे जीवन जगात आहे. कोण आहे ही व्यक्ती? ती व्यक्ती आहे त्यांचा चुलतभाऊ अनुप रामचंद्र. अमिताभ यांच्या काकांचा मुलगा आणि त्यांचे कुटुंब अमिताभ यांच्या खूप जवळचे होते. मात्र नंतर असे काही झाले की हे दोन्ही भाऊ आणि त्यांची कुटुंबं एकमेकांपासून दुरावले.

अनुप रामचंद्र यांच्या कुटुंबाकडे देखील आधी थोडे पैसे होते, पण नंतर मात्र त्यांना गरीबीत दिवस जगावे लागत आहेत. अमिताभ आणि अनुप यांच्यामध्ये वडीलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू आहेत. अनुप आणि त्यांचे कुटुंबीय कटघर मधील अमिताभ यांच्या घरात राहतात. अनुपच्या मते हे घर वडीलोपार्जित आहे. या घरावरून अमिताभ आणि अनुप यांच्यात वा’द सुरू आहेत.

सध्या अमिताभ आणि त्यांचे कुटुंबीय अनुप आणि त्यांच्या कुटुंबापासून लांब राहणेच पसंत करतात. अनुप अभिषेक बच्चन च्या लग्नाला देखील आले नव्हते. त्यांनी त्यांच्याकडे लग्नाला येण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगितले. वडीलोपार्जित घराचा वा’द हे कारण सांगितले जात असले तरी अजून अमिताभ आणि अनुप यांच्यातल्या दुराव्याचे खरे कारण समजले नाहीये.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यात घडत असतात. मात्र सामान्य माणसांपर्यंत त्या खूप कमी वेळा पोचतात. त्यासाठीच आमची ही वेबसाइट बनवलेली आहे. नियमितपणे आमचे लेख वाचत चला आणि शेअर देखील करत राहा.

You might also like