एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘आता फातिमासोबत लग्न’!’ आमिरच्या घट’स्फो’टानंतर सोशल मीडिया वर मीम्स चा पाऊस…

दुसरी लाट संपवून अमीर खान आता झपाट्याने तिसऱ्या लाटेकडे, किरण राव नंतर आता या अभिनेत्रीशी जोडलं जातंय अमीरच नाव..

पावसाळ्याच्या दिवसातही बऱ्याच भागातून पाऊस गायब झाला असला तरी सोशल मीडिया वर मात्र रोज कसला ना कसला पाऊस पडत असतो. कधी नव्या बातम्यांचा, कधी मीम्स चा, कधी नव्या अ’फे’अर्स चा तर कधी कोट्स चा. सध्या हिंदी इंडस्ट्रीत हॉट टॉपिक असलेला आमिर खान याच्यावरचा बातम्यांनी सोशल मीडिया वर पाऊस पाडला आहे.

त्याला कारणही तसेच घडले आहे. नुकताच आमिर खानचा त्याची दुसरी पत्नी किरण राव बरोबर घट’स्फो’ट झाला. तब्बल पंधरा वर्षे या दोघांचे लग्न टिकले. मात्र अचानक आलेल्या त्यांच्या या घट’स्फो’टाच्या बातमीने इंडस्ट्रीत खळबळ उडाली. दोघांनी ऑफिशियल स्टेटमेंट जाहीर करत आपल्या घट’स्फो’टाची बातमी जगासमोर आणली.

पहिली पत्नी रीना दत्ता शी घट’स्फो’ट घेतल्यानंतर २००५ मध्ये आमिर आणि किरण चे लग्न झाले होते. गेल्या एक वर्षापासून दोघे वेगळे राहात असल्याचे नंतर समोर आले. या दोघांच्या घट’स्फो’टाचे कारण मात्र कळू शकले नाही.

‘दंगल’ (२०१६) चित्रपटाच्या वेळी फातिमा सना शेख आणि आमिर खान यांच्या अफे’यर च्या बऱ्याच चर्चा पसरल्या होत्या. फातिमाने या चित्रपटात आमिरच्या मुलीचे काम केले आहे. आमिर आणि फातिमाच्या फोटोज् वरून त्यांच्यात नक्कीच काहीतरी शिजतंय असे निष्कर्ष काढले जात होते. फातिमाने मात्र या चर्चांना खतपाणी न घालता तो विषय तिथेच थांबवला.

आता आमिर आणि किरण च्या घट’स्फो’टानंतर पुन्हा या चर्चेला उधाण आले आहे. लोकांनी यावर मीम्स तयार करत ते सोशल मीडिया वर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर आधीच फातिमा आणि आमिर च्या लग्नाला शुभेच्छा देत ‘किमान हे तरी लग्न जास्त काळ टिकू दे’ असे म्हटले आहे. ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ (२०१८) मध्ये देखील आमिर आणि फातिमा ने एकत्र काम केले आहे. याच चित्रपटातल्या आमिर च्या व्यक्तिरेखेचा डायलॉग असलेले मीम देखील तयार केले गेले आहे. ‘फसवणं हा माझा स्वभाव आहे’ अशा आशयाचा तो डायलॉग आहे. आधी रीना दत्ता, मग किरण राव, आता आमिरचे तिसरे टार्गेट कोण असेल असा प्रश्नदेखील या मीम्स च्या माध्यमातून विचारला जात आहे.

काही का असेना, या निमित्ताने सोशल मीडिया वर लोक पुन्हा सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. आमिर खानने परत लग्न केल्यास आम्ही ते नक्कीच आमच्या प्रिय वाचकांना कळवू. तोपर्यंत आमचे लेख वाचत राहा, शेअर करत राहा.

 

You might also like