एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आमिर खानचा भाऊ फैसल खान म्हणतो, “मी माझ्या पत्नीला सांभाळू शकत नाही”, खिशात एकवेळेच्या जेवण्यासाठी पैसे नाहीत..

हल्ली सोशल मीडियावर खुप साऱ्या कलाकारांचा खरेपणा लोकांच्या समोर येत आहे, सोशल मीडिया माध्यम हे तसे चांगलेही आहे आणि तितकेच वाईट त्यामुळे याच्या पासून लांब राहिलेलं कधीही चांगलं पण बॉलिवूड मधील कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी या सोशल मीडिया प्रकारचा खूप जास्त वापर करत असतात पण आता सध्या एक नवीन न्यूज व्हायरल होत आहे ते म्हणजे अमीर खान यांच्या भावाबद्दल..

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता अमीर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सारखा चर्चेत आहे. अमीर आणि त्यांची पत्नी किरण राव यांचा काही महिन्यांपूर्वी घट’स्फो’ट झाला आहे. त्यावेळी अनेक नेटीझन्सनी सोशल मीडियावर आमिरबद्दल आपले मत व्यक्त केले होते. आता आमिरचा भाऊ फैजल खानला एका मुलाखतीत त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले.

यावेळी त्याच्या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मुलाखतीत फैजलला विचारण्यात आले की, “तू लग्न कधी करणार?” असा प्रश्न होता. या प्रश्नाला फैजलने उत्तर दिले, ‘सध्या माझ्याकडे माझ्या पत्नीची काळजी घेण्यासाठी किंवा माझ्या मित्रासोबत राहण्यासाठी पैसे नाहीत. पत्नीची काळजी घेणे खूप महाग आहे. मला ते परवडणार नाही. माझा जेव्हा चित्रपट हिट होईल, तेव्हा मी लग्नासाठी मुलगी शोधेन.

फैजलला अमीर खान आणि किरणच्या घट’स्फो”टाबद्दलही विचारण्यात आले. तो म्हणाला, ‘मी अमीर आणि किरणला कोणताही सल्ला दिला नाही. मी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर दखल देखील देणार नाही.

काही दिवसांपूर्वी फैजलचा रस्त्यावर वडापाव खातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून अमीर खानला ट्रो’ल केले होते. खूप सारी वर्ष बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर अमीरचा भाऊ फैजल खान लवकरच ‘फॅक्टरी’ या नव्या प्रोजेक्ट मधून पुनरागमन करणार आहे.

फैजलने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात विक्रम भट्टच्या ‘मधोश’ चित्रपटातून केली. ‘प्यार का मौसम’ मध्ये फैजलने शशी कपूरची बालपणीची भूमिका साकारली होती. फैजलने २००० सालच्या ‘मेला’ चित्रपटातील अभिनयामुळे विशेष लोकप्रियता मिळवली. फैजलने ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपटातही काम केले आहे. फैजलचा नवीन चित्रपट ‘फॅक्टरी’ हा ३ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि ट्रेलरमधील फैजलच्या भूमिकेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

You might also like