एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आमिर खान-किरण राव घट’स्फो’टः १५ वर्षानंतर घेतला म्हणून वेगळे होण्याचा निर्णय!

आम्ही काही दिवसांपुर्वीच वेगळं होण्याचा प्लान सुरु केला होता, मुलांचा एकत्रपणे सांभाळ करू!

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आमिर खान आपल्या पत्नीपासून घट स्फो ट घेत आहे. याचा खुलासा स्वत: आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी केला आहे. ही बातमी सोशल मीडियावर येताच आगीसारखी पसरली आहे. सोशल मीडियावर ही बाब चर्चेत आली आहे.

आमिर खान आणि किरण राव यांनी अलीकडेच आपल्या नात्यावरती एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं होत. या मध्ये दोघांनी हि म्हणले होते कि ‘या १५ वर्षात आम्ही एकत्र सुंदर दिवस पहिले एकमेकांसोबत आनंद सामायिक केला आहे. आमचे नात्यात फक्त विश्वास, आदर आणि प्रेम वाढले आहे. आता आपण आपल्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करू इच्छितो.

नवरा-बायको म्हणून नव्हे तर सह-पालक आणि कुटुंब म्हणून. आम्ही आधी पासून वेगळी होण्याची योजना सुरू केली होती. आता या व्यवस्थेचे औपचारिकरण करण्यात आरामदायक वाटते.

संयुक्त निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, “वेगळे राहूनही आम्ही दोघेही एकत्रित कुटुंब म्हणून आपले आयुष्य सामायिक करू. आम्ही आमचा मुलगा आझाद याला समर्पित पालक आहोत ज्यांना आपण एकत्र वाढवू. आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि ज्या प्रकल्पांची आम्हाला खूप काळजी आहे त्यांचे सहकार्य करणे सुरू ठेवू.

कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना किरण राव आणि आमिर खान पुढे म्हणाले, “ज्यांच्याशिवाय आम्हाला हे पाऊल उचलण्यास इतके सुरक्षित वाटले नसते अशा आमच्या नातेसंबंधात निरंतर सहकार्य आणि समजून घेतल्याबद्दल आमची कुटुंबे व मित्रांचे आभार. आम्ही आमच्या हितचिंतकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद घेत आहोत आणि अशी आशा आहे की आमच्याप्रमाणे आपण हा घट स्फो ट शेवटच्या रूपात पाहणार नाही परंतु नवीन प्रवासाची सुरुवात म्हणून पहाल.

आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट आमिर खानच्या फिल्म लगानच्या सेटवर झाली होती. आमिरने लगानमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती आणि किरण राव यांनी या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यादरम्यान या दोघांनीही एकमेकांना आपले मन दिले आणि त्यानंतर दोघांचे लग्न झाले.

२८ डिसेंबर २००५ रोजी लग्नानंतर दोघे एक झाले. २०११ साली सरोगसीच्या माध्यमातून दोघेही मुलगा आझाद राव खानचे पालक झाले. किरणशी लग्न करण्यापूर्वी आमिर खानचा घट स्फो ट झाला होता.

रीना दत्ता सोबत केले होते पहिले लग्न:
किरण रावशी लग्न करण्यापूर्वी आमिर खानने रीना दत्ताशी लग्न केले. आमिरने चित्रपटात येण्यापूर्वी रीना आणि आमिरचे १९८६ मध्ये लग्न झाले होते. आमिर आणि रीनाने १६ वर्षानंतर २००२ साली आपले लग्न संपवले. आमिर आणि रीना यांना दोन मुले आहेत, त्यांची नावे आयरा खान आणि जुनैद खान अशी आहेत.

You might also like