एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

करोडोच्या संपत्तीचा मालक असून या प्रसिद्ध अभिनेत्याचा भाऊ मात्र काढतोय रस्त्यावरचा वडापाव खाऊन दिवस..

बाॅलिवुड म्हटलं की लोकांना फक्त झगमगाट, यश, प्रसिद्धी या गोष्टी दिसतात. पण याही पलीकडे बरंच मोठं बाॅलिवुड आहे. अलीकडे नेपोटीझम सारख्या एका प्रकारातून याची प्रचिती आपल्याला येतच गेली असेल. घराणेशाहीचा जितका फायदा तितका तोटादेखील होतो. याची कल्पना फारच थोड्या लोकांना असेल. प्रेक्षकांनी तुम्हाला नाकारलं की सगळा खेळच समाप्त होतो. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा ; प्रेक्षकांच्या अपेक्षेला मुकलात की प्रेक्षक तुम्हाला आपोआप नाकारतात.

बऱ्याच जणांबद्दल असं घडलेलं आहे कि नातेवाईक किंवा घरचेच चांगले अभिनय करतात पण मुलांना तसा अभिनय जमला नाही म्हणून प्रेक्षकांनी त्यांना नाकारलय. असेच काही घडले होते, बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या भावाबद्दल. अनेकांना माहित देखील नसेल की, अमीर खानचा भाऊसुद्धा एक अभिनेता होता. जाणुन घेऊयात नेमका काय किस्सा आहे.

‘मेला’ सिनेमा तर सर्वाना आठवत असेल, त्याच सिनेमामध्ये आमिर सोबत सहकलाकार असणारा हिरो म्हणजेच त्याचा भाऊ फैजल खान. यापुर्वी बऱ्याच सिनेमामध्ये फैजलने स्वतः ला आजमावले पण त्याला यश काही मिळाले नाही. या त्याच्या सततच्या अपयशामुळे तो मानसिक त्रा’सांत गेला. पुढे त्याला डि’प्रे’श’नचा त्रा’स जाणवु लागला.

यामुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये काम मिळेनासे झाले. काम नाही त्यात मानसिक अस्थिरता यामुळे त्याची परिस्थिती आणखीणच वाईट बनत गेली. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. यातच काही वर्षांपूर्वी फैजल खानचा एक व्हिडियो सगळीकडेच तुफान वायरल झाला होता. या व्हिडियोमध्ये फैजलने अनेक खळबळजनक खु’ला’से केले होते.

त्यामध्ये तो म्हणाला होता की ,’माझ्या कुटुंबीयांनी मला वेडं करण्याचा डाव मांडला होता. बऱ्याच दिवसांपासून मला चु’की’च्या गोळ्या देत होते. मला एक वर्षांहून अधिक काळापासून घरात डांबून ठेवले होते. सगळं काही मिळेल, पण मला घरातच रहावं लागेल. मला घराच्या बाहेर जाऊ दिले नाही. चुकी’च्या गोळ्या देऊन मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला.

मी सगळं काही निमूटपणे सहन केलं. मला वाटत होत की, माझ्या कुटुंबातील कोणाला तरी माझी दया येईल. माझ्या अवस्थेबद्दल कोणाचे तरी हृदय पिळवटेल, मात्र असं काहीच झालं नाही. माझी अवस्था अधिकच बिकट होत गेली. ज्यावेळी, माझ्याकडून माझा सर्व हक्क काढून घेण्यासाठी कागदांवर माझी सही घेण्यात येऊ लागली तेव्हा मात्र माझा संयम सुटला.

शेवटी मी माझ्या हक्कांसाठी को’र्टा’त जायचे ठरवले. मी के’स लढली आणी ती जिंकलीसुद्धा. यानंतर नव्याने माझा प्रवास चालु झाला. मी अजुनही प्रयत्न करत आहे.’ फैजल च्या या खुलाश्यामुळे प्रचंड गोंधळ माजलेला होता. आणि आमिर खानवर देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते. आता पुन्हा त्याचे काही फोटो आणि एक व्हिडियो सगळीकडे वायरल होत आहे.

यामध्ये फैजल खान एका वडापाव च्या दुकानासमोर उभं राहून वडापाव खात आहे. हातात ग्लव्स, खांदयावर एक साईडबॅग आणि अगदी साधा शर्ट, या लूकमध्ये त्याला ओळखणे देखील अवघड झाले आहे. आनंदाची बातमी म्हणजे फैजल लवकरच त्याचा फॅक्टरी नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. विशेष गोष्ट म्हणजे फैजलने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

फैजल घैऊन येत असलेल्या या नव्या सिनेमामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्यार का मौसम या चित्रपटातून त्याने बालकलाकाराची भूमिका साकारत करियर ला सुरूवात केली होती. त्यानंतर कयामत से कयामत तक या सिनेमामध्ये त्याने खलनायकाची भूमिका रेखाटली होती.

जो जिता वही सिकंदर, मदहोश,आणि मेला अशा सिनेमात त्यानं काम केलं आहे. पण आता मात्र फैजल च्या व्हायरल फोटोवर प्रेक्षक बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर त्याच्या या परिस्थितीला खुद्द आमीरला दोषी धरत आहेत.

You might also like