एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘हेराफेरी’ मधील ही चिमुरडी लक्षात आहे का? आता दिसते इतकी बोल्ड…

काही चित्रपट हे अभिजात कलाकृतीचे नमुने असतात. तसाच एक चित्रपट आहे ‘हेराफेरी’. खरंतर या चित्रपटाची ओळख करून द्यायला लागत नाही. कारण ‘बस नाम ही काफी है’! २००० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. निखळ मनोरंजनाचा हा एक उत्तम नमुना आहे. हा चित्रपट कितीही वेळ पाहिला तरी तितकाच फ्रेश अनुभव देतो. कितीही वेळा पाहिला तरी लोक पोट धरून हसतात.

मीमर्ससाठी तर हा चित्रपट म्हणजे पर्वणीच आहे. या चित्रपटातील अनेक प्रसंग आजही पोट दुखेपर्यंत हसायला लावतात. हेच प्रसंग वापरून आज अनेक मीम्स तयार केले जातात. या मीम्स ना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. ही सगळी या चित्रपटाची कमाल आहे.

परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाने या चित्रपटात धमाल आणली होती. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित झाला. त्यालाही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता त्याच्या तिसऱ्या भागाची तयारी सुरू आहे, असे अभिनेते परेश रावल यांनी सांगितले.

या चित्रपटाचे कितीही भाग आले तरी पहिल्या भागाला लोक कधीच विसरणार नाहीत. आपल्या रोजच्या अडचणींना तोंड देत जगणारे, एकमेकांशी सतत भांडणारे तरीही वेळप्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे असे हे घरमालक बाबुराव आणि त्यांचे दोन भाडेकरू राजू आणि श्याम. यांच्या रोजच्या त्याच त्या आयुष्यात एका रॉंग नंबरमुळे उलथापालथ होते.

एका मुलीच्या अपहरणामुळे खंडणी मागणारा कॉल चुकून यांना लागतो आणि मग सुरू होतो एक भन्नाट खेळ. हा खेळ कसा रंगतो, येणाऱ्या अडचणींना हे तिघे कसे सामोरे जातात याचा हास्यमय प्रवास म्हणजे ‘हेराफेरी’.

या चित्रपटात ज्या मुलीचे अपहरण होते तिचे चित्रपटातील नाव आहे रिंकू. ही भूमिका साकारली होती बालकलाकार अलेक्सिया अनारा या चिमुरडीने. आपल्या निरागस अभिनयाने ही चिमुरडी प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. आता ही चिमुरडी बरीच मोठी झाली आहे. ‘हेराफेरी’ चित्रपटानंतर ती मनोरंजन सृष्टीपासून लांब गेली. मात्र सोशल मीडिया वर ती बरीच सक्रीय असलेली बघायला मिळते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Annie (@annanra)

तिचे सोशल मीडिया वरचे फोटो बघितले असता लक्षात येईल, की ती निरागस चिमुरडी आता बरीच मोठी झाली असून लहानपणीपेक्षा खूप वेगळी दिसते आहे. आता अलेक्सिया ३१ वर्षांची आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Annie (@annanra)

इतकेच नाही, तर आता ती खूप स्टायलिश झाली असून आपले आकर्षक फोटो ती सोशल मीडिया वर अपलोड करत असते. तिचे हे बोल्ड अँड ब्युटीफूल फोटो अनेकांकडून लाईक केले जातात. तिचा हा लूक बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Annie (@annanra)

You might also like