एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आजोबा आणि नातीच्या भां’डणात कोण जिंकले? अर्थात गोड नात! पहा विडिओ

लहान मुलांनी एखादी गोष्ट करायची ठरवली आणि त्यांना ती नको करू असं सांगितलं, की ती करण्यासाठी त्यांना अजूनच चेव चढतो. मग मोठ्यांनी कितीही मनाई केली, तरी ती गोष्ट केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. वेळप्रसंगी ही लहान मुलं आपल्याला हवं ते करण्यासाठी भां’डतात सुद्धा! पण खरं सांगायचं तर या चिमुरड्यांची भां’ड’णं ही भां’ड’णं वाटतच नाहीत मुळी.

मोठ्यांनी एखादी गोष्ट करू नको म्हटल्यावर ती का करायची नाही असा त्यांचा निरागस प्रश्न, नको म्हटल्यावर पण तेच करण्याचा बालहट्ट, ते करूनच दाखवायचं हा आवेश अशा सगळ्याच गोष्टींचं कौतुक वाटतं.

लहान मुलांनी काहीही केलं तरी त्याचं कौतुकच होतं. कारण लहान मुलं खूप गोड असतात. त्यांची मोठ्यांबरोबरची लुटुपुटूची भां’ड’णं देखील ऐकायला खूप मजेशीर आणि गोड वाटतात. या व्हिडिओ मधली अशीच एक चिमुरडी आपल्या आजोबांच्या सांगण्यानंतरसुद्धा ऐकत नाहीये आणि आपल्याला हवं तेच करतेय. हा व्हिडिओ जरी जुना असला तरी बाललीला कधीच जुन्या होत नसतात.

तर या व्हिडिओ मध्ये नातीला पायऱ्यांवरून वर जायचे आहे. मात्र ती पायऱ्या चढताना पडू शकते, या काळजीपोटी तिचे आजोबा तिला वर जाऊ नको असे सांगतात. पण ऐकेल ती नात कसली! ती पायऱ्यांवर घुटमळत असते. आजोबा तिला पायऱ्या चढू नको असं म्हणतात. त्यावेळी ती मी पायऱ्या चढत नाहीये असं म्हणत राहते. मात्र तोंड आजोबांकडे असलं तरी पाय मात्र हळूच एक एक पायरी चढत राहतात. खरंतर ही चिमुरडी इतकी लहान आहे की तिचे शब्दही नीट समजत नाहीत. मात्र हे भां’ड’णं बघणं खरंच खूप मजेशीर आहे.

आजोबा तिला सतत वर जाऊ नको असे म्हणतात. मात्र ही चिमुरडी “मैं किधर नहीं जा रही” असे म्हणत एक पाय वरच्या पायरीवर ठेवते. आजोबानी पुन्हा जाऊ नको म्हटल्यावर ती तो पाय खाली घेते आणि दुसरा पाय वरच्या पायरीवर ठेवते. असे करत करत ती ४-५ पायऱ्या सहज चढून जाते. हे करताना आजोबांचे सतत ‘वर जाऊ नको’ चे पालुपद सुरूच असते आणि चिमुरडी देखील ‘मी कुठेच जात नाहीये’ वर ठाम असते.

जेव्हा जेव्हा नातीची पाठ फिरते, आजोबा काळजीपोटी ती पडू नये म्हणून तिला अलगद आधार देतात. घरातले सगळेच हे बघत असतात आणि आजोबा-नातीच्या या लुटुपुटूच्या लढाईवर हसत असतात. तुम्हाला नातीचा हा बालहट्ट कसा वाटला, ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा.

You might also like