एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

टीव्हीवरती एकेकाळी कृष्ण, राम, रावणाची भूमिका करणारे हे कलाकार आता इतक्या वर्षांनी दिसतात असे..पाहून ओळखणार हि नाही..

रामायण आणि महाभारत यांनी दूरदर्शनचा इतिहास रचला ज्याला अनेक दशकांपर्यंत लोक आठवणीत ठेवतील. ८० च्या दशकात चालू असलेल्या रामायण आणि महाभारत या दोन मालिकांनी टेलीविजनच्या जगात एक इतिहास घडविला, जो अनेक दशका पर्येंत लोक विसरू शकणार नाहीत. या मालिकांमध्ये खूप पात्र आहेत, ज्याच्याबद्दल लोकांना जाणून  घायचे आहे. लोकांना माहिती करून घायचे आहे कि अभिनेते कुठे आहेत काय करत आहेत .  चला जाणून घेऊ.

आम्ही तुम्हाला रामायण आणि महाभारतातील काही प्रसिद्ध पात्रांबद्दल सांगणार आहोत,  यापूर्वी आम्ही तुम्हाला या दोन्ही मालिकांशी संबंधित काही खास त’थ्य सांगणार आहोत. २५ जानेवारी १९८७ ला दूरदर्शनवर प्रथमच रिलीज होणारी रामायण मालिका आजही ३० वर्षानंतर लोक विसरले नाहीत. रामायण आणि महाभारत या कथेतून लोकांना नेहमीच आनंद मिळाला आहे.

म्हणूनच बाहुबलीसारखा ब्लॉकबस्टर फिल्म बनवणारा एस.एस. राजामौलीही महाभारतावर चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे बजेटही त्याने १००० कोटी रुपये ठेवले आहे. या चित्रपटात कृष्ण – अर्जुनची भूमिका साकारण्यासाठी मोठे अभिनेते खूपच उत्सुक आहेत. इतकेच नव्हे तर सुमारे ५०० कोटींच्या बजेटसह रामायणवर एक चित्रपट तयार होणार आहे आणि तो चित्रपट हिंदीसह तेलगू आणि तमिळ भाषेतही बनविला जाणार आहे.

नितीश भारद्वाज

महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज ह्यांना त्यावेळी लोक  भगवान कृष्ण समजत होते. ज्या ठिकाणी महाभारतावर शूटिंग चालली होती, तिथे लोक त्यांना पाहण्यासाठी तासन्तास उभे राहत असत. त्या काळातील कॅलेंडरच्या फोटोत नितीश भगवान श्रीकृष्णाच्या जागी दिसले होते.  या भूमिकेमुळे नितीश घरा-घरा मध्ये पोचले. आजही बर्‍याच लोकांना माहिती करून घ्याचे आहे कि नितीश कोठे आहेत आणि काय करीत आहेत.

महाभारतानंतर नितीशने   तब्बल १०  मराठी आणि एक मल्याळम चित्रपटात काम केले.  त्यानंतर तो काही वर्षे लंडनमध्ये गेला आणि तिथे इंग्लिश नाटक मध्ये काम केले. तसेच त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाच्या तिकिटावर त्याने लोकसभेच्या निवडणुकाही जिंकल्या व खासदारही बनला. पण नितीश यांना राजकारण फारसे आवडले नाही आणि त्याने  राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला.

अरुण गोविल

रामायणात रामची भूमिका साकारणार्‍या अरुण गोविल याने एक्टिंग करियर  १९७७ मध्ये चालू केले होते. त्याने सावन को आने दो, सांच को आंच नहीं, और इतनी सी बात , हिम्मतवाला, दिलवाला, ह’थकड़ी आणि लव कुश अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे. रामानंद सागर यांच्या मालिका रामायणातून अरुण गोविलला त्यांची खरी ओळख मिळाली.

रामायणानंतर अरुण गोविलने लव कुश, कैसे कहूं, बुद्धा, अपराजिता, वो हुए न हमारे आणि प्यार की कश्ती में अशा बर्‍याच लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. पण अरुण गोविलला रामायणातून जी ओळख मिळाली, ती इतर कोणाकडूनही मिळू शकली नाही. अरुण सध्या मुंबईत एक प्रॉडक्शन कंपनी चालवतो, जी दूरदर्शनसाठी सीरियल बनवते.

अरविंद त्रिवेदी

रामायणात राम आणि सीतेच्या भूमिकेला जेवढे लोकांनी प्रेम दिले, तेवढेच प्रेमही रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांनाही दिले आहे. अरविंदने सुमारे २५० हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्यांची खरी ओळख रामायणातून मिळाली.  पडद्यावरील त्याचे हास्य ऐकून, त्याच्या आवाजाची ती धमकी, रावण खरोखरच पडद्यावर असल्यासारखा लोक विचार करू लागले होते.

रामायणानंतर अरविंद विश्वामित्र या मालिकेत दिसले होते. अनेक मालिकांमध्ये काम केल्यावर अरविंद अचानक टीव्ही विश्वातून गायब झाले. १९९१ मध्ये अरविंद भाजपमध्ये दाखल झाले. ते भाजपचे राज्यसभेचे खासदार झाले. ते अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे निकटचे मानले जात होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like