एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आजी आणि नातीमध्ये सुरू झालंय भां’ड’ण! इतकं गोड भां’ड’ण पाहिलंय का कधी?

आजी-आजोबा आणि नातवंडांचं नातंच वेगळं असतं. आजी आणि आजोबांसाठी नातवंडं म्हणजे दुधावरच्या सायीसारखी असतात. त्यांना ते तेवढंच जपतात. यांच्यात भां’ड’णं झाली तरी ती अगदी लुटूपुटूची लढाई असते. क्षणात भांडतील, तर क्षणात एक होतील. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. आजी आणि नात यात भांडत आहेत. पण त्यांचं भां’ड’ण इतकं गोड आहे, की बघताना वेळकाळाचं भान रहात नाही.

या व्हिडिओ मध्ये आजी आणि तिच्या दोन नाती दिसत आहेत. यातली एक नात अगदी जीव तोडून आजीशी भांडत आहे, तर दुसरी नात मात्र या दोघींची मजा बघत हसत बसली आहे. भां’ड’ण अगदी कडाक्याचं चाललं आहे आणि तेही सगळ्या घरच्यांसमोर! सकाळच्या धावपळीत मुलींनी थोडी मस्ती केली आहे.

आजीचं न ऐकता त्या आपल्याच विश्वात दंग आहेत. आजीचं न ऐकल्यामुळं आजीनं त्यांना धपाटा ठेवून दिला. मात्र आजीला घाबरण्याऐवजी यातल्या एका नातीने आजीलाच मारलं. आणि मग सुरू झाली आजी आणि नातीची जुगलबंदी.

मोठी माणसे जे करतात त्याचेच अनुकरण लहान मुलं करताना दिसतात. त्यामुळे आजीने मारल्यावर नातीनेही आजीला मारलं. आजी अगदी तावातावाने नातीला विचारताना दिसत आहे, की तिने का मारलं. आजी अगदी हातवारे करून खरंखुरं भां’ड’ण असल्यासारखं नातीशी भांडत आहे. नात पण अगदी आजीचं अनुकरण करत भांडत आहे. खरंतर बोलता येण्याइतकीही ही चिमुरडी मोठी नाहीये. पण ती ज्या आवेशाने भांडते आहे, ते बघून हसू आल्याशिवाय राहात नाही.

खरंतर ही चिमुरडी अजून खूपच लहान असल्याने तिला अजून बोलता येत नाहीये. पण तिला आजीशी भांडायचेच आहे. त्यामुळे आजी जे हातवारे करते आहे तेच ती देखील करते आहे. मात्र तिचा जोश अगदी बघण्यासारखा आहे. मध्येच या मुलींच्या आईने येऊन विचारले, की काय चालले आहे.

आजीने त्याच जोशात तुझी मुलगी माझ्याशी भांडते आहे म्हणून सांगितले. गंमत म्हणजे, यावेळीही नातीने आजीची हुबेहूब नक्कल केली. मात्र जोश जराही ढळू दिला नाहीये. या दोघींना असं भांडताना बघून या चिमुरडीची जुळी बहीण मात्र मस्त मनोरंजन होतंय म्हणून हसत बसली आहे.

/p>

आजकाल तंत्रज्ञान खूप पुढे गेल्यामुळे लहान मुलांचे असे क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवता येतात. नंतर हे क्षण बघताना आपणही काहीसे आपल्या भूतकाळात जातो आणि मनाने लहान होतो. तुम्हाला ही नात आणि आजीची लुटूपुटूची भां’ड’णं कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा.

You might also like