एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा गरोदर आहे का? लवकरच होणार नवीन पाहुण्याचे स्वागत..

बॉलिवूड सेलिब्रेटी म्हटलं की त्यांच्या खाजगी आयुष्यात लोकांना फारच रस असतो. मात्र याच कारणामुळे सेलिब्रेटी आपले वैयक्तिक आयुष्य लपवून ठेवायचा प्रयत्न करत असतात. तरी देखील जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा लोक त्यांच्या आयुष्यात डोकावून पाहण्याचा चान्स सोडत नाहीत. आता या गोष्टींमुळेच ऐश्वर्या राय-बच्चन च्या गरोदरपणाची चर्चा सोशल मीडिया वर होताना दिसत आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन च्या स्टाईल कडे लोकांचे बरेच लक्ष लागून राहिलेले असते. १९९४ मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकला होता. तिने त्यानंतर आपल्या मॉडेलिंग करिअर ला सुरुवात केली.

मॉडेलिंग करत करत तिने चित्रपटांमधून काम करायला सुरुवात केली. नुकतंच तिने ‘पोन्नीयीन सेल्वन’ या तमिळ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. या चित्रीकरणासाठी ती सध्या तामिळनाडू मध्ये आहे.

रविवारी ती पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बरोबर चित्रपटातील को-स्टार सरथ कुमारच्या घरी गेली होती. या भेटीचे फोटो अभिनेते सरथ कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री वरलक्ष्मी आणि मुलीने इंस्टाग्राम वर शेअर केले. या फोटोत ऐश्वर्याने काळा ऑफ-शोल्डर टॉप घातलेला पाहायला मिळाला. ऐश्वर्या या फोटोंमध्ये थोडी जाड देखील दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Varalaxmi Sarathkumar (@varusarathkumar)

चाहत्यांच्या नजरेतून या फोटोमधील अजून एक गोष्ट सुटली नाहीये. ऐश्वर्या प्रत्येक फोटो मध्ये आपले पोट लपवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तिचे वाढलेले वजन, अंगभर कपडे आणि पोट झाकण्याचा प्रयत्न बघून अनेक जणांनी ऐश्वर्या पुन्हा गरोदर असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

‘ऐश्वर्या पुन्हा प्रेग्नन्ट आहे का?’ असा प्रश्न कमेंट्स मधून चाहत्यांनी विचारला आहे. अनेक चाहते ऐश्वर्या आणि अभिषेक चे यासाठी अभिनंदन करताना दिसून आले.

दुसरीकडे वरलक्ष्मीने अभिषेक आणि ऐश्वर्या ला भेटल्याचा आनंद व्यक्त केला आहे. या भेटीबद्दल तिने आपल्या पोस्ट मधून या दोघांचे आभारही मानले आहेत. २००७ मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाल्यावर २०११ मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला.

त्यानंतर तिने आपले सगळे लक्ष आपल्या मुलीच्या संगोपनाकडे दिले. आता हा नवीन फोटो बघितल्यावर बच्चन कुटुंबात नव्या पाहुण्याची चाहूल लागणार का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन ने याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र फोटो बघून अंदाज बांधणाऱ्यांनी मात्र बच्चन कुटुंबातल्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे. तुम्हाला काय वाटतं मंडळी ऐश्वर्याच्या या परिस्थितीबद्दल? आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा.

You might also like