एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘अग्गबाई सूनबाई’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काय आहे कारण या एक्झिट चे?

झी मराठी वाहिनी तिच्या दर्जेदार मालिकांसाठी ओळखली जाते. गेल्या कित्येक वर्षांमध्ये झी मराठीने आपल्या प्रेक्षकांना आपलेसे केले आहे आणि त्यांना टिकवून ठेवले आहे. अलीकडे मात्र वाहिनीच्या मालिकांचा दर्जा घसरत चालल्याचे दिसते.

झी मराठी च्या प्रेक्षकांना कायम उत्तम मालिका, उत्तम कथा, उत्तम व्यक्तिरेखा आणि उत्तम कलाकार बघायची सवय झाल्याने या श्रेणीत न बसणाऱ्या मालिकांकडे प्रेक्षक लगेच पाठ फिरवतात. तसेच या वाहिनीवरील एका मालिकेच्या बाबतीत घडले आहे.

‘अग्गबाई सासूबाई’ (२०१९) ही मालिका प्रसारीत झाली आणि त्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. मालिकेचा वेगळा विषय आणि त्या विषयाला कलाकारांनी दिलेली उत्तम साथ यांचे गूळपीठ मस्त जमून आले होते आणि प्रेक्षकांनी ते खूप आपलेसे केले होते.

आपल्या वि’ध’वा सासूच्या पुनर्विवाहाला पाठींबा देणारी सून या मालिकेत दाखवण्यात आली आहे. सासू आणि सुनेचे खूप गहिरे नाते या मालिकेत दाखवण्यात आले आहे. इतर सासू-सुनांच्या मालिकांसारखा हा विषय नसल्याने प्रेक्षकांना ही मालिका प्रचंड आवडून गेली होती. या मालिकेत तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ, गिरीश ओक, आशुतोष पत्की या कलाकारांनी आपल्या भूमिका खूप उत्तम वठवल्या होत्या.

ही मालिका संपल्यानंतर त्याचाच पुढचा भाग म्हणून ‘अग्गबाई सूनबाई’ ही मालिका सुरू झाली. पण या मालिकेची ढिसाळ बांधणी, मूळ कथेला धक्का देणारी पात्रं, कलाकारांची चुकलेली निवड आणि भरकटलेले कथानक प्रेक्षकांच्या पचनी पडले नाही.

या सगळ्या कारणांमुळे प्रेक्षकांनी या मालिकेकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी पुरता घसरला आहे. या सगळ्यामुळे मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे.

‘अग्गबाई सूनबाई’ मधली शुभ्रा अगदीच लेचीपेची, स्वतःचा विचार न करणारी अशी गृहिणी दाखवली आहे. स्वतःच्या असल्या बायकोला कंटाळलेला सोहम ऑफिसमधल्या आपल्या सेक्रेटरीबरोबर अ;फेयर सुरू करतो. मग सुरू होतो नेहमीच्या मालिकांसारखा खेळ.

‘अग्गबाई सासूबाई’ सारख्या हटके मालिकेच्या नावाखाली ‘अग्गबाई सूनबाई’ सारखी रटाळवाणी कथा खपवण्याचा केलेला प्रयत्न मालिकेच्याच अंगलट आला आहे. या सगळ्यामुळे मालिकेने प्रेक्षकांची नापसंती ओढवून घेतली आहे.

अर्थात या सगळ्याची परिणीती ही मालिका बंद होण्यात झाली आहे. लवकरच ‘अग्गबाई सूनबाई’ ही मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रेक्षकांना मात्र या बातमीमुळे आनंदच झाल्याचे दिसून येत आहे. ही मालिका बंद झाल्यास त्या जागी दुसरी कोणती मालिका सुरू होणार याची मात्र प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

You might also like