एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दुःखद! बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या पतीचे नि’धन, हार्ट अटॅकनंतर घेतला अखेरचा श्वास..

Actress Mandira Bedi's husband Raj Kaushal passes away

बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे, प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती आणि दिग्दर्शक-निर्माता राज कौशल यांचे आज सकाळी नि ध न झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नि ध न झाले. ते फक्त ४९ वर्षांचे होते. राज कौशल यांनी विवारीच मित्रांसमवेत मेजवानी केल्याची माहिती आहे आणि सोमवारी त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि म्हटले की ‘त्यांचा एक मस्त रविवार होता’.

राज कौशल यांनी ‘प्यार में कभी-कभी’, ‘शादी का लड्डू’, ‘एंथनी कौन है’ या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या अचानक मृ त्यू मुळे बॉलिवूड मध्ये सर्वाना धक्का बसला आहे.

१९९९ मध्ये मंदिरा बेदीबरोबर राज कौशलचे प्रेम विवाह झाले होते, दोघांनाही लग्नापासून एक मुलगा आहे आणि गेल्या वर्षी दोघांनाही मुलगी झाली, ज्याचे नाव तारा बेदी असे आहे. नुकताच फादर्स डेच्या दिवशी राज कौशलने आपल्या कुटूंबासमवेत एक फोटो शेअर केला होता. फोटो पोस्ट करताना राज-मंदिराने असा विचार केला नसेल की हा त्यांचा हा फादर्स डेचा शेवटचा असेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

राज कौशलच्या मृ त्यू ची कबुली त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. राज कौशल यांना आज पहाटे साडेचार वाजता घरीच हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरकडे नेण्यापूर्वीच त्यांनी जगाला निरोप दिला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी राज कौशलच्या नि ध ना वर शोक व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Bose Roy (@rohitboseroy)

राज कौशल यांचे जवळचे मित्र रोहित बोस यांनी आपल्या मित्राच्या मृ त्यू बद्दल शोक व्यक्त करणारा एक फोटो सोशल मीडिया वरती शेअर केला आणि त्यामध्ये त्यांनी लिहले आहे- “राज, माझा मित्र, माझा भाऊ, जिथं तुझे पुढचे गंतव्य आहे तेथे आनंद पसरवत रहा. मला खात्री आहे की आपण आत्ता स्वर्गात एक चांगले स्थान शोधत आहात! आम्ही सर्वांनी तुमच्यावर मनापासून प्रेम केले आणि दुर्दैवाने, आम्ही पुढच्या आठवड्यात पुढील आठवड्यात सांगत राहिलो आणि तो आठवडा कधी आला नाही”

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like