एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आर्यन खान ड्र’ग्ज प्रकरणानंतर अभिनेत्री क्रांती रेडकरने दिली पहिल्यांदाच पतीच्या कामावर प्रतिक्रिया!

सगळ्यांचा लाडका अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृ’त्यू’नंतर अं’म’ली पदार्थांच्या रॅ’के’टचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. बॉलीवूडला या अं’म’ली प’दा’र्थांचा विळखा पडला आहे याची पुन्हा प्रचिती आली. या अंमली पदार्थांमुळे बॉलीवूडला अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. या संदर्भातील अजून एक प्रकरण आता नव्याने समोर आले आहे.

शनिवारी २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई लगतच्या समुद्रात एका क्रूझवर एनसीबीने छा’पा टाकला. त्यांना या क्रूझवर रे’व्ह पार्टी होणार असल्याची टीप मिळाल्यानंतर वेषांतर करून त्यांनी या क्रूझवर प्रवेश मिळवला आणि वेळ येताच छा’पा टाकला. या प्रकरणी ११ जणांना ताब्यात घेण्यात आलं. या ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील आहे. आर्यनची या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात अजून एक नाव सारखं समोर येत आहे. हे नाव कोणत्याही सेलिब्रेटीचं नसून ते आहे या प्रकरणातील मुख्य नायक एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांचं. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. समीर वानखेडे हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. आर्यन खान अ’ट’क प्रकरणानंतर क्रांतीने आपल्या पतीच्या कामाबद्दल आपल्याला खूप अभिमान असल्याचे सांगितले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की “एक पत्नी म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. ते खूप मेहनती आहेत. त्यांनी या पूर्वीही अशी अनेक प्रकरणे हाताळली आहेत. पण आता हे प्रकरण बॉलिवूडशी संबंधित असल्याने याबद्दल बरीच चर्चा होत आहे.”

एक पत्नी म्हणून क्रांतीवर खूप जबाबदारी आहे. क्रांतीने पुढे सांगितले, की “जेव्हा समीर एखादे प्रकरण हाताळत असतात, तेव्हा मी त्यांना त्यांचा पूर्ण वेळ देते. मी कधीच त्यांना काय सुरू आहे किंवा कसे सुरू आहे, असे प्रश्न विचारत नाही. मी घरातील सर्व गोष्टींकडे लक्ष देत असते, जेणेकरून त्यांना त्यांच्या कामाकडे लक्ष देता येईल. कधी कधी समीर कामात इतके व्यस्त असतात, की मोजून २ तास झोपतात. कामासंबंधी फोन सुरू असताना मी कधीही त्यांना कोणतेही प्रश्न विचारत नाही. ते त्यांच्या सिक्रेट ऑपरेशनवर काम करत असतात. कुटुंबियांनाही ते याबाबत कधीच माहिती देत नाहीत. मी त्यांच्या कामाचा आदर करते आणि याबाबत कधीच तक्रार करत नाही.”

You might also like