एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

स्वतःचे जेट तर पुण्यामध्ये आहे स्वतःची जमीन, अभिनेता सनी देओल आहे इतक्या संपत्तीचा मालक

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे नाव ऐकले की लगेच चित्रपटातील हातपंप उखडल्याचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. सनी देओलने अभिनित केलेला हा चित्रपट प्रचंड गाजला. ९० च्या दशकात सनी देओल हे नाव बरेच गाजले. त्याची डान्स करण्याची तसेच डायलॉग म्हणण्याची स्टाईल बरीच गाजली. अभिनयासोबतच सनीने दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले आहे. सध्या तो राजकारणाच्या आखाड्यातही उतरलेला दिसून येतो.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

बेताब (१९८३), यतीम (१९८८), चालबाज (१९८९), घायल (१९९०), दामिनी (१९९३), डर (१९९३), घातक (१९९६), जीत (१९९६), बॉर्डर (१९९७), जिद्दी (१९९७), द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय (२००३), अपने (२००७), हिरोज (२००८), यमला पगला दिवाना (२०११), आय लव्ह न्यू इयर (२०११), सिंग साब द ग्रेट (२०१३), घायल वन्स अगेन (२०१६), पोस्टर बॉईज (२०१७), मोहल्ला अस्सी (२०१८) अशा अनेक चित्रपटांमधून सनी देओलने आपली अभिनयाची जादू दाखवून दिली आहे. १९९९ मध्ये त्याने ‘दिल्लगी’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर सनी देओलची संपत्ती उघड झाली. उमेदवाराच्या फॉर्ममध्ये शिक्षण, संपत्ती आदि माहिती भरावी लागते. तशीच सनी देओलनेही माहिती भरली आहे. या माहितीनुसार, सनी आणि त्याची पत्नी पूजा देओल यांच्याकडे मिळून जवळपास ८७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सनी देओल जवळ २१ कोटी रुपयांची स्थावर तर ६० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे कळते. त्याच्या बँक अकाऊंटला ९ लाख तर घरात २६ लाख रुपये कॅश असल्याचेही यात नमूद केले होते.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

त्याची बायको पूजा ६ कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेची मालकीण असल्याचे समजते. तसेच तिच्या बँक अकाऊंटला १९ लाख रुपये असून तिच्याजवळ १६ लाख रुपयांची कॅश आहे. सनी आणि पूजा या दोघांवर मिळून ५३ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही कळते. सनीचा ७ कोटी रुपयांचा जीएसटी भरणे बाकी असून त्याच्यावर १ कोटी रुपयांचे सरकारी कर्ज असल्याचेही सूत्रांकडून कळते. पुण्यातल्या त्याच्या जमिनीची किंमत जवळपास १ कोटी ५६ लाख रुपये आहे. त्याच्या अंधेरी मधल्या फ्लॅटची किंमत २ कोटी ४० लाख इतकी आहे.

सनी देओलकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे २४ लाखांची ऑडी, प्रत्येकी ४१, ७७, २५ लाखांच्या ३ रेंज रोव्हर कार आणि एक टोयोटा क्वॉलिस पण आहे. आपल्या अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मधून तो दरवर्षी लाखो पैसे कमवतो.

You might also like