एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर! असतात नेहमी लाइमलाईट पासून दूर..पहा

शेतकऱ्याच्या घरात जन्माला येऊन देखील आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने चित्रपटसृष्टीत यशाच्या शिखरावर पोचलेले नाव म्हणजे सयाजी शिंदे. सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी नावाच्या छोट्याशा गावातून सयाजी शिंदे नावाचा प्रवास सुरू झाला.

१९७८ पासून त्यांनी एकपात्री प्रयोगांमध्ये अभिनय सुरू केला आणि त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. अनेक नाटक आणि चित्रपटांमधून सयाजी यांनी काम केले आहे. मराठी रंगमंचापासून सुरू झालेली घोडदौड पुढे मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, इंग्रजी, गुजराती आणि भोजपुरी चित्रपटांपर्यंत पोचली, जी आजही कायम आहे.

सयाजी शिंदे यांना उत्कृष्ट खलनायक, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, उत्कृष्ट अभिनेता असे अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. अबोली (१९९५) या मराठी चित्रपटाने त्यांना खरी प्रसिद्धी आणि ओळख मिळवून दिली. सखाराम बाईंडर, झुलवा (१९८७), वन रूम किचन (१९८९) आणि आमच्या या घरात (१९९१) ही त्यांची काही गाजलेली मराठी नाटके. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या मराठी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं.

आपल्या अभिनय कौशल्याने रंगमंच आणि चंदेरी पडदा गाजवणारे सयाजी शिंदे चित्रपटसृष्टीत येण्याआधी दरमहा १६५ रुपये पगारावर महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचा नाईट वॉचमन म्हणून काम करायचे. त्यावेळी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देखील सुरू होते. यादरम्यान निर्माण झालेली नाट्यगृहाची आवड त्यांना अभिनय क्षेत्रात घेऊन आली.

सयाजी शिंदे यांनी ‘डॅम्बीस’ सारख्या काही मराठी चित्रपटांच्या सहनिर्मिती मध्ये देखील भाग घेतला आहे. कीर्तीच्या शिखरावर पोचलेला हा माणूस केवळ एक उत्तम अभिनेता नाही, तर तो एक चांगला माणूस देखील आहे.

सयाजी शिंदे जरी वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करत असले तरी त्यांची मराठी मातीशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. सयाजी शिंदे सामाजिक कार्यांमध्ये भाग घेत अनेक लोकांना जमेल तशी मदत करत असतात.

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांच्या पत्नीचे नाव अलका शिंदे आहे, तर मुलाचे नाव सिद्धार्थ शिंदे आहे.

हे दोघेही फारसे लाइमलाईट मध्ये नसतात त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना फार माहिती नाही. मात्र सोशल मीडिया वर त्यांचे फोटो बघायला मिळतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alka Shinde (@alkasayaji)

या फोटोंवरून आपल्या लक्षात येईल की सयाजी शिंदे यांच्या पत्नी अलका प्रत्यक्षात दिसायला खूपच सुंदर आहेत. सयाजी शिंदे आणि अलका यांचे एकत्र काढलेले बरेच फोटो आपल्याला सोशल मीडिया वर बघायला मिळतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alka Shinde (@alkasayaji)

You might also like