एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

खेड्यातून आलेली प्राजक्ता अशी बनली सर्वांची लाडकी अभिनेत्री, जाणून घ्या मराठमोळी अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’चा जीवन प्रवास..

प्रत्येक सुंदर दिसणाऱ्या मुलीला वाटत असते कि आपण हि एक मोठी अभिनेत्री व्हावे. अनेक जणांचे हे स्वप्न स्वप्नच बनून राहते. परंतु काही कलाकार स्वतःच्या कष्ट-परिश्रमाने हे स्वप्न पूर्ण देखील करतात. आज आम्ही या लेख मध्ये असाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत.

आम्ही बोलत आहोत सर्वांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी बद्दल. आम्ही तुम्हाला प्राजक्ताची जीवन गाथा सांगणार आहोत, तिचा हा प्रवास खूप थक्क करणारा आहे. एका छोट्याश्या गावातून पुढे आलेली प्राजक्ता आज सर्वांच्या मनावर राज्य करते.

प्राजक्ता माळीचा जन्म सोलापूर जिल्यातील पंढरपूर येथे झाला असून पंढरपूर शहर हे विठ्ठल आणि रुक्मिणी देवस्थानासाठी  खूपच प्रसिद्ध आहे. तसेच सगळ्याची लाडकी प्राजक्ता माळी हि अवघ्या वयाच्या ७ वर्ष पासूनच भरत नाट्यम आणि अभिनयाची धडे घेत होती. तसेच तिने विद्देचे माहेर घर असणाऱ्या पुण्याच्या ललित कला केंद्र मधून ऊच्च शिक्षण पूर्ण केले आहे.

प्राजक्ता माळी ने शिक्षण पूर्ण केल्या नंतर अभिनयाच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. ती शिक्षण घेत असताना युनिव्हर्सिटी टॉपर होती. तसेच तिला नृत्यासाठी स्कॉलरशिप देखील भेटत होती, तिच्या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पुरस्कार भेटले आहेत.

तसेच पुढे तिने अभिनय आणि नृत्य चा अचूक समतोल राखत तिने अभिनयामध्ये खूपच मोठी भरारी घेतली. “जुळून येति रेशीम गाठी, नकटीच्या लग्नाला यायचा हा” या सारख्या मालिका मध्ये खूप सुंदर अभिनय करून तिने प्रेक्षकांची खूपच मने जिंकली.

आपण तिच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तिने “खो-खो, हंपी,पार्टी,डोक्याला शॉट, डॉक्टर काशिनाथ घाणेकर” या सारख्या चित्रपट मधून तिने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. तसेच तिने खूप साऱ्या कार्यक्रम मध्ये सूत्र संचालनची धुरा देखील सांभाळी आहे आणि खूप उत्तम पणे तिने सूत्रसंचालनाची भूमिका देखील पार केली.

तसेच आज तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडतो तिची बोलण्याची कला देखील खूप सुंदर आहे. प्राजक्ताचा सामाजिक कार्याचा सहभाग देखील खूप मोलाचा आहे. तिने लॉक डाउन असो किंवा म’हा’पूर असो तिने खूप मोठ्या मानाने लोकांना मदत केली आहे.

तसेच तिच्या फॅशन सेन्स चा विचार केला तर तीचे कौतुन करावे तेवढे कमीच आहे. तिच्या या फॅशन सेन्स मुळेच तिला २०२० साली स्टाईल रत्न सुवर्ण पुरस्कार दिला तेव्हा आम्हाला खूपच अभिमान वाटला. तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे एका छोट्याश्या गावातून जाऊन आज एवढी मोठी स्टार झाली आहे आपली प्राजक्ता माळी.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like