एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे..’ मधील तो बालकलाकार आत्ता झालाय एवढा मोठा, बगून विश्वास नाही बसणार..

छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे..टुपी-टुपी टप-टप’ हे गाणं आजपर्यंत सगळ्यांनाच चांगलंच आठवत आहे, ९० मधील दशकामध्ये आलेली फिल्म मासूम ह्यातील हे गाणं खूपजण गुणगुणत असतात. परंतु ह्या फिल्ममध्ये एक व्यक्तिरेखा सुद्धा होती त्याच नाव किशन अस होत आठवत का ? ह्या गाण्यात त्याला चित्रित केले आहे.

हा बालकलाकार त्यावेळी खूप प्रसिद्ध झाला होता पण तुम्हाला माहीत आहे का हा कलाकार आत्ता काय करतो आणि एवढ्या वर्षानंतर तो कसा दिसतो?

अजूनही आपल्याला लक्षात आले नसेल हे, नक्की! जाऊदे, पण ह्या अभिनेत्याचे नाव आहे ओमकार कपूर. ओमकार कपूर आत्ता खूप मोठा झाला आहे तो अधिसारखा नुसता गोंडस नाही तर खूप सुंदर दिसंत चाललंय.

ओमकार कपूर ह्यांनी लहान असताना इंडस्ट्री मध्ये खूप साऱ्या फिल्म्स हिट्स केल्या होत्या पण ते मोठे झाल्यावर मात्र इंडस्ट्री मध्ये कमी दिसतायेत.

ओमकार कपूर ९० च्या दशकात खूप साऱ्या चित्रपटात दिसले होते, त्यांनी फिल्म ‘जुडवा’ मध्ये सलमान खान यांच्या बालपणीची भूमिका निभावली आहे, त्याचबरोबर हिरो नं.१ मध्ये ते गोविंदा सोबत दिसले होते.

त्यानंतर आलेली फिल्म ‘जुदाई’, मध्ये ते अनिल कपूर आणि श्रीदेवी ह्यांच्या मुलाची भूमिका करत होते. मेला आणि इंटरनॅशनल खिलाडी ह्यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटात दिसल्यानंतर ते बॉलिवूड विश्वापासून थोडं लांब राहू लागले.

त्यानंतर खूप वेळ ब्रेक घेऊन ओमकार कपूर २०१५ मध्ये आलेली फिल्म ‘प्यार का पंचनामा २’ मध्ये दिसले होते, ह्या चित्रपटात त्यांनी तरुण नावाची भूमिका केली होती.

एवढ्या वर्षानंतर ते फिल्ममध्ये आल्यामुळे दर्शक त्यांना नीट ओळखू शकले नाही कारण त्यांच्यात आत्ता खूप बदल झाला आहे. लव रंजन मधील त्यांच्या अभिनयाबद्दल वाह वाह झाली होती, परंतु ह्या फिल्मच्या आधी २०१४ मध्ये ओमकार एपिक चॅनेलवरील “सियासत”, सिरीयल मध्ये दिसले होते, पण दुर्दैवाने तो शो हिट होऊ शकला नाही.

ओमकार यांनी लहानपणी असताना फिल्ममध्ये काम करत असताना आपल्या शिक्षणातून ब्रेक घेतला होता, परंतु आत्ता सुद्धा ते इंडस्ट्री पासून खूप लांब गेलेलं नाही आहेत, आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ओमकारने फिल्म असिस्टंट डायरेक्टर संजय लीला भन्साळी, फरहान खान आणि अहमद खान यांच्यासोबत देखील काम केलं,’ प्यार का पंचनामा २’, नंतर ते ‘यू मी और घर’ आणि ‘झूठा कही का’ ह्या चित्रपटात दिसले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like