एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मुळशी पॅटर्न’ मधील या अभिनेत्याची पत्नी ही आहे एक प्रसिध्द अभिनेत्री, केले अनेक मालिकांमध्ये काम..पहा

बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे मराठी हि आता मागे नाहीत. एका पेक्षा एक दमदार चित्रपटांनी मराठी चित्रपट इंडस्ट्री सज्ज झाली आहे. सैराट, मुळशी पॅटर्न, दुनियादारी या सारख्या चित्रपटांनी मराठी इंडस्ट्रीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

सन २०१८ साली आलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने सगळ्या मराठी चित्रपट इंडस्ट्रीला हादरवून सोडले होते. या चित्रपटातील गाण्यानें हि खूप धुमाकूळ घातला होता. सत्य घटनेवरती आधारित हा चित्रपट मराठीतील एक प्रसिद्ध चित्रपट म्हणून सिद्ध झाला आहे.

या चित्रपटामध्ये अनेक नवीन कलाकारांनी भूमिका साकारली होती. या मध्ये प्रवीण तरडे, दीप्ती धोत्रे, ओम भुतकर, माल्विका गेकवाड, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी आणि महेश मांजरेकर या कलाकारांचा समावेश होता.

चित्रपटाच्या यशानंतर या कलाकारांचे आयुष्य बदलून गेले आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका बजावणारे राहुल्या आणि गण्या यांची जोडी खूपच प्रसिद्ध झाली. आज या लेख मध्ये गण्याची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या बायको बद्दल  सांगणार आहे.

या कलाकाराचे खरे नाव क्षितीश असून त्याने मुळशी पॅटर्न व्यतिरिक्त जिंदगी विराट, भाई २, …And Buddha Smiled! या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता क्षितीशची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे.

ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत कुस्ती प्रशिक्षकाची भूमिका करणारी अभिनेत्री ऋचा आपटे आहे. ऋचा आपटेने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘बन मस्का’ मालिकेत क्षितीश आणि ऋचा एकत्र दिसले होते. या शिवाय ऋचाने  ‘अस्सं माहेर नको गं बाई’,  ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या सारख्या मालिकेत भूमिका साकारली आहे.

ऋचा आणि क्षितीश यांनी अनेक नाटके, मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील ऋचाची सखीची भूमिका लोकांनी फारच पसंद केली. दोघेही आता आपले जीवन सुखी जगत आहेत. एकदम झक्कास टीम कडून या दोघांना भावी वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like