एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

क्रिश चित्रपटामधील ‘बहादुर’आठवतोय का? आता इतक्या वर्षी दिसतोय असा आणि करतोय हे काम..जाणून विश्वास बसणार नाही

बॉलिवूड सारख्य मोठया फिल्म इंडस्ट्री मध्ये सुरवाती पासून अनेक मोठ मोठे कलाकार होऊन गेले. काही कलाकारांनी तर अवोरात्र त्यांचे अधिराज गाजवले. पण या इंडस्ट्री मध्ये असे हि काही कलाकार आहे जे आता प्रसिद्धी मिळवून पद्याआड गेले आहेत. हे कलाकार आता काय करतात कुठे राहतात आपणास काही ठाऊक नसते.

म्हणून आज आम्ही या लेख मध्ये एक कलाकार बद्दल बोलणार आहे ज्याने चित्रपटामध्ये लोकांना खूप हसवयचे काम केले आहे. लोकांना त्यांचा अभिनय खूप आवडायचा. या कलाकाराचे नाव आहे हेमंत पांडे. अभिनेता हेमंत पांडे यांनी क्रिश चित्रपटामध्ये केलेली बहादुरची भूमिका लोकांना खूप आवडली होती.

१ जुलै, १९७० साली पिथोरागार्ह उत्तराखंड येथे जन्मलेल्या हेमंत पांडे यांनी ‘मुझे कुछ कहना’ या बॉलिवूड चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामध्ये रेहना है तेरे दिल में, बिन बुलाये बराती, रेडी, फरेब,  मुझे कुछ कहना है, या सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारली, याशिवाय त्यांनी टीव्ही मालिकेत हि काम केले आहे.

त्यांना इंडस्ट्रीमध्ये खरी ओळख हि २३ जून, २००६ रोजी रिलीज झालेल्या क्रिश या चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटामध्ये ह्रितिक रोशन, प्रियांका चोप्रा, रेखा, यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये हेमंत पांडे यांनी बहादुरची भूमिका साकारली होती. जी लोकांना खूपच आवडली होती. या चित्रपटामध्ये त्यांनी जरी छोटी भूमिका केली असली तरी त्यांनी या भूमिकेने सर्वांचे मन जिंकले होते.

हेमंत पांडे यांनी पुस्तके वाचणे, प्रवास करणे, टीव्ही पाहणे खूप आवडते. त्यांच्या पत्नीचे नाव पुष्पा पांडे असून या दोघांना २ मुले आहेत. आपल्या शाळा आणि महाविद्यालयीन काळात त्यांनी अनेक पथनाट्य आणि थिएटर कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. ते जॉनी वॉकर आणि जॉनी लीव्हर या विनोदी कलाकारांद्वारे प्रेरित आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like