एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनय क्षेत्रामध्ये येण्याआधी हे मराठमोळे कलाकार करायचे येथे नोकरी..३ नंबरची ओळखत हि नाही

सोनेरी पडद्याचे आकर्षण बऱ्याच जणांना असते. खूप कमी जण या पडद्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकतात. त्यापैकी काही अगदी मोजकेच असे असतात ज्यांना खूप कमी स्ट्रगल मध्ये यश मिळते. काही कलाकार मात्र आपला जॉब सांभाळत हे काम करत असतात तर काहींना या क्षेत्रात येण्यासाठी जॉब सोडावा लागतो. पण ज्यांना अभिनय क्षेत्रात आपले करिअर पुढे न्यायचे असते ते या गोष्टींचा फारसा विचार करत नाहीत. असे लोक पडतील ते कष्ट करत आपले ध्येय साध्य करत असतात.

आज अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेऊया. यापैकी काही कलाकार अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी नोकरी करायचे आणि या क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. काही कलाकार मात्र असे आहेत ज्यांनी नोकरी आणि अभिनयातले करिअर अस्से दोन्ही सांभाळत तारेवरची कसरत लिलया निभावून नेली आहे. चला तर मग, ओळख करून घेऊया अशाच काही कलाकारांची.

१. सुबोध भावे
या अभिनेत्याला ओळखत नाही असा प्रेक्षक शोधूनही सापडणार नाही. अनेक नायक आणि खलनायक तितक्याच ताकदीने रंगवलेल्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सुबोध भावे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एका खाजगी कंपनीत सेल्स विभागात कामाला होते. त्याचवेळी त्यांची अभिनयाची कारकीर्द देखील सुरू झाली. जेव्हा अभिनयाच्याच क्षेत्रात अखंड काम करायचा निर्णय झाला, तेव्हा सुबोधनी आपले खाजगी कंपनीतले काम सोडले आणि आपला पूर्ण वेळ अभिनयाला द्यायला सुरुवात केली.२. माधवी निमकर
उत्तम अभिनय, डान्स आणि योगा यांचं जमून आलेलं मिश्रण म्हणजे माधवी निमकर. सध्या ‘शालिनी’ या खलनायिकेचं पात्र रंगवणाऱ्या माधवी सुरुवातीच्या काळात एका कंपनीत काम करत. काम आणि अभिनय असा ताळमेळ साधत त्यांनी आपली कारकीर्द घडवली. अभिनयासाठी पूर्ण वेळ दिल्यानंतर त्यांनी कंपनीतले काम सोडले. आता आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये माधवी निमकर हे नाव घेतले जाते.३. रूपाली भोसले
‘आई कुठे काय करते’ मध्ये ‘संजना’ ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर रुपालीच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रुपालीने अनेक ठिकाणी कामे केली. एका कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आपली अभिनयाची आवड जपण्यासाठी त्यांनी आपले काम सांभाळत दोन्ही ठिकाणी काम सुरू ठेवले. काही वैयक्तिक कारणांसाठी रुपाली काही काळ अभिनय क्षेत्रापासून लांब होत्या. पण त्यानंतर त्यांनी केलेला कमबॅक हा जबरदस्त होता. जिद्द असेल तर कोणतेही काम अवघड नसते हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.असे अनेक कलाकार इंडस्ट्री मध्ये आहेत ज्यांनी आपले काम आणि अभिनय अशी दोन्ही क्षेत्रे सांभाळत यशाचे शिखर गाठले आहे. यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम! अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया पुढच्या लेखात.

You might also like