एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘आई कुठे काय करते’ मधील यशच्या आयुष्यातील ‘ही’ आहे खरी गौरी! ती देखील आहे अभिनेत्री..

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांना चांगलीच खिळवून ठेवत आहे. मालिकेतील संवाद आणि ट्विस्ट प्रेक्षकांना फार आवडत आहेत. या मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांच्या अगदी घरचे होऊन गेले आहेत. मालिकेतील काही कलाकारांविषयी प्रेक्षकांना फार कमी माहिती आहे. ‘आई कुठे काय करते’ मधील यश हा देखील असाच एक कलाकार. यशची भूमिका साकारली आहे अभिनेता अभिषेक देशमुखने. खूप जणांना हे माहीत नाही की त्यांच्या लाडक्या यशचे म्हणजे अभिषेक देशमुखचे लग्न झालेले आहे.

अभिषेक अभिनेता असण्याबरोबरच एक लेखक देखील आहे. त्याने भाऊसाहेब हिरे कॉलेज, मालेगाव येथून आपली आर्किटेक्चरची पदवी पूर्ण केली आहे. त्याने काही नाटके लिहून दिग्दर्शितही केली आहेत. दोन गोष्टी, कर्वे… बाय द वे!, ओ! फ्रिडा, पैगाम ही त्याची काही नाटके आणि एकांकिका आहेत. त्याने ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत देखील काम केले आहे.

या मालिकेत त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव ‘पुनर्वसू’ होते. ‘होम स्वीट होम’ नावाच्या फिचर फिल्म मध्ये देखील त्याने काम केले आहे. मालिका आणि नाटकांसह अभिषेकने काही वेब सिरीज मध्येही काम केलं आहे. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत तो साकारत असलेली यशची भूमिका प्रेक्षकांची आवडती व्यक्तिरेखा आहे.

अभिषेक विवाहित आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याने ६ जानेवारी २०१८ मध्ये कृतिका देव बरोबर लग्नगाठ बांधली. कृतिका देखील एक अभिनेत्री आहे. तिने ‘राजवाडे अँड सन्स’ (२०१५) या चित्रपटात काम केले आहे.

source: instagram.com/abhisheksdeshmukh

तिने ‘हॅपी जर्नी’ (२०१४) या मराठी चित्रपटातही काम केले आहे. अभिनेता प्रथमेश परब सोबत तिने ‘प्रेम दे’ या वेब सिरीज मध्येही भूमिका निभावली आहे. मराठी बरोबरच तिने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटात तिने काम केले आहे.

source: instagram.com/abhisheksdeshmukh

अभिषेक आणि कृतिका दोघेही सोशल मीडिया वर प्रचंड सक्रीय आहेत. एकमेकांबरोबरचे काही विनोदी व्हिडिओ देखील ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. दोघेही फोटोंमध्ये खूप गोड दिसतात. तर मंडळी, तुम्हाला अभिषेक आणि कृतिकाची जोडी कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा. यशची ही खऱ्या आयुष्यातील गौरी तुम्हाला माहीत होती का, हे देखील आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

source: instagram.com/abhisheksdeshmukh

You might also like