एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिज्ञा भावे झाली आहे शिक्षिका! घेतेय अंकिता लोखंडेचे मराठीचे क्लासेस…पहा विडिओ

सध्या अंकिता लोखंडे आणि शाहिर शेख यांच्या ‘पवित्र रिश्ता २.०’ मालिकेची चर्चा सुरू आहे. झी टीव्ही वाहिनी वरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता हीच मालिका नव्या रुपात झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर भेटायला येत आहे. या मालिकेत अनेक मराठी चेहरे बघायला मिळणार आहेत. अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी सारखे आधीच्या मालिकेतील काही कलाकारही यात काम करताना दिसणार आहेत.

मालिकेत अभिज्ञा भावे ही मराठी अभिनेत्री देखील झळकणार आहे. अभिज्ञा या मालिकेद्वारे हिंदी माध्यमामध्ये पदार्पण करत आहे. ती अंकिता लोखंडेच्या वहिनीची म्हणजेच मंजुषाची भूमिका साकारत आहे. ऑनस्क्रीन जरी या दोघींचं पटत नसलं तरी ऑफस्क्रीन या दोघींची खूप घट्ट मैत्री झालेली पाहायला मिळत आहे. अगदी बेस्ट फ्रेंडच म्हणा ना! त्यामुळे दोघी अगदी सणासुदीला देखील एकमेकींच्या घरी जाताना पाहायला मिळत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

अलीकडेच गणेशोत्सवाच्या काळात अभिज्ञा अंकिताच्या घरी बसवलेल्या गौरीचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. गणेशोत्सवात दोघींनी एकमेकींना भेटून खूपच मजा केली. अभिज्ञा अंकिताला मराठी शब्द शिकवत असताना अभिज्ञाने तिचा एक व्हिडिओ शूट केला आहे. हाच गमतीदार व्हिडिओ अभिज्ञाने सोशल मीडिया वर शेअर केला आहे.

यामध्ये अभिज्ञा अंकिताचे मराठी भाषेचे क्लास घेताना दिसत आहे. अंकिताला अभिज्ञाचे नाव मराठी मध्ये म्हणताना कसरत करावी लागलेली या व्हिडिओ मधून दिसते आहे. हिंदी भाषेत ‘ज्ञ’ चा उच्चार ‘ग्य’ असा होत असल्याने अंकिताला अभिज्ञाचं मराठीमध्ये नाव घेताना अडचण येत असल्याचं दिसलं. पण अंकिताने खूप छान प्रयत्न करत अखेरीस अभिज्ञा हे नाव घेतलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

अशीच काही गंमत दोघी करत असल्याचं या व्हिडिओ मधून दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये अंकिताने तिला अभिज्ञाचं नाव खूप आवडत असल्याचं सांगितलं. तिचे नाव उच्चारण्यावरून दोघींमध्ये बऱ्याच गमतीजमती झालेल्या या व्हिडिओ मधून पाहायला मिळत आहेत.

अंकिता लोखंडेच्या घरी दरवर्षी गौरींचं थाटात आगमन होतं. अशावेळी तिचे अनेक मित्रमैत्रिणी तिच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला येत असतात. अंकिता लोखंडे मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचीही मैत्रीण आहे. या गणपतीत अमृता आपल्या आईबरोबर अंकिताच्या घरी दर्शनाला गेलेली पाहायला मिळाली. यावेळी अंकिताने अमृता आणि तिच्या आईबरोबर खास फोटो काढले. हे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर तिने पोस्ट केले आहेत.

Source: Rajshri Marathi

You might also like