एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘आयत्या घरात घरोबा’ मधील ही अभिनेत्री ओळखली का? तिचा पतीही आहे एक प्रसिद्ध अभिनेता..

१९९१ मध्ये सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘आयत्या घरात घरोबा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकृतींपैकी एक म्हणून ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटाचे नाव घेता येईल. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, राजेश्वरी सचदेव यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

‘आयत्या घरात घरोबा’ हा अभिनेत्री राजेश्वरी सचदेवचा पहिला-वहिला चित्रपट. या चित्रपटात तिने ‘कानन’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कानन ही सचिन पिळगावकर यांची बहीण दाखवली आहे. ती नंतर लक्ष्याच्या प्रेमात पडते. अभिनय क्षेत्रातील पदार्पणातच राजेश्वरीला अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

या चित्रपटाच्या यशानंतर राजेश्वरीला श्याम बेनेगल यांच्या ‘सूरज का सातवा घोडा’ (१९९३) या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तिने श्याम बेनेगल यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राजेश्वरीने मराठी बरोबरच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by rajeshwari (@rajeshwarisachdev)

त्याचबरोबर तिने काही मोजक्या इंग्रजी, उर्दू आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच राजेश्वरी एक थेटर आर्टिस्ट, गायिका, नृत्यांगणा आणि एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे.

१९९३ मध्ये तिने ‘लिटल बुद्धा’ या इंग्रजी चित्रपटात यशोधरेची भूमिका निभावली होती. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरदारी बेगम’ या उर्दू चित्रपटात तिने ‘सकीना’ ही सहाय्यक भूमिका केली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by rajeshwari (@rajeshwarisachdev)

या भूमिकेसाठी तिला सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ‘नॅशनल फिल्म अवॉर्ड’ ही मिळाला आहे. राजेश्वरीने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. १९९४ ते २००१ च्या दरम्यान तिने अन्नू कपूर बरोबर झी टीव्ही वरील ‘अंताक्षरी’ या गाण्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

मम्मो (१९९४), हरी-भरी (२०००), नेताजी सुभाषचंद्र बोस- द फरगॉटन हिरो (२००५), वेलकम टू सज्जनपूर (२००८), इसक (२०१३), संहिता (२०१३), वेलकम जिंदगी (२०१५), फायरब्रँड (२०१८) हे राजेश्वरीचे काही गाजलेले चित्रपट. मार्गारीटा (१९९७), ओम नमः शिवाय (१९९७), रिहाई (२००४), संविधान (२०१४), बालिका वधू (२०१५), पेशवा बाजीराव (२०१७), दिल ही तो है (२०१८), शादी मुबारक (२०२०) यांसारख्या मालिकांमध्येही राजेश्वरीने काम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by rajeshwari (@rajeshwarisachdev)

२००५ मध्ये तिने आपल्या पती बरोबर ‘नच बलिये’ या डान्स रिऍलिटी शो मध्ये भाग घेतला होता. तिचे पती वरुण बडोला हेदेखील प्रसिद्ध हिंदी अभिनेते आहेत. अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. ये है मुंबई मेरी जान, कोशीश- एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व- एक प्रेम कहाणी अशा मालिकांमधून त्यांनी कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारल्या आहेत.

You might also like