एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आर्ची-परश्या आले पुन्हा एकत्र! रिंकू आणि आकाशचे फोटो होत आहेत सोशल मीडिया वर व्हायरल..

‘सैराट’ (२०१६) चित्रपटाने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. यातली आर्ची आणि परश्या ची जोडी तर तुफान लोकप्रिय झाली होती. मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाने इतिहास घडवला, तर यापूर्वी अभिनयाचा गंधही नसलेले रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रातोरात स्टार झाले. या दोघांची पडद्यावरही केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडून गेली होती. त्यामुळे पुन्हा या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसले आहेत.

‘सैराट’ चित्रपटानंतर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर आपल्या आपल्या मार्गांनी निघून गेले. आपली अभिनय कारकीर्द चालू ठेवत दोघांनी अनेक चित्रपट आणि वेब सिरीज मधून कामे केली आहेत. ‘झुंड’ या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. पण हा चित्रपट अजून प्रदर्शनाच्या मार्गावर नाहीये. त्यामुळे आर्ची-परश्याच्या चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल.

मात्र नुकताच या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. ‘सैराट’ चित्रपटानंतर या दोघांचे एकत्र फोटो चाहत्यांना बघायला मिळाले नव्हते. मात्र नुकतेच ‘खूप दिवसांनी जुन्या जवळच्या मित्रांची भेट’ अशी कॅप्शन टाकत या दोघांनी आपले एकत्रित काढलेले फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.

दोघेही ‘सैराट’ नंतर इतक्या वर्षांनी भेटले आणि त्यांनी काही धमाल फोटो काढले. सोशल मीडिया वर शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.

‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित होऊन पाच वर्षे झाली तरीही या दोघांची जोडी ही प्रेक्षकांची फेवरेट आहे. हे फोटो पाहिल्यावर या दोघांचे चाहते ‘आता सैराट २ कधी येणार’ असे विचारत आहेत. काही चाहत्यांनी या दोघांची जोडी खूप छान वाटते अशी कमेंट केली आहे. एकूणच काय, तर आर्ची-परश्याची जादू आजही टिकून आहे.

या दोघांच्या या फोटोंवर खूप सारे लाईक्स आले असून चाहत्यांनी त्यावर कमेंट्स चा वर्षाव केला आहे. या दोघांच्या अशाच गाठीभेटी होत राहोत आणि दोघांची जोडी खूप साऱ्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकत राहू दे, अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे.

आर्ची-परश्या या जोडीला आणि रिंकू-आकाश च्या मैत्रीला आमच्या टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा! मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या जोडीबद्दल? ही जोडी तुमचीही फेवरेट आहे का? आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमंडळींमध्ये जर कुणी आर्ची-परश्या चे फॅन्स असतील तर त्यांच्याबरोबर हा लेख जरूर शेअर करा.

You might also like