एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘काय होतीस तू, काय झालीस तू…’ रिंकूच्या नव्या फोटोशूटवर चाहत्यांची प्रतिक्रिया..

अभिनयाचा ‘अ’ देखील माहीत नसलेली एक मुलगी तिच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेसाठी उत्तम अभिनेत्रीचं पारितोषिक घेऊन जाते. सगळीकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. मग ती आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत राहते.

या मधल्या वेळात ती आपला कायापालट देखील करते आणि सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. मंडळी, ही कोणत्याही चरित्रपटाची कथा नाहीये. ही कथा आहे एका खऱ्याखुऱ्या अभिनेत्रीची. त्या अभिनेत्रीचं नाव आहे रिंकू राजगुरू.

रिंकूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर नवीन फोटोशूटचे फोटो अपलोड केले आहेत. यात तिने पांढरी अँकल लेंथ जॉगर पॅन्ट घातली असून त्यावर पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे.

एका फोटो मध्ये तिने आपले केस पोनीटेल मध्ये बांधले आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने आपले खांद्यापर्यंत येणारे केस मोकळे सोडले आहेत. एका फोटोमध्ये तिचा कुत्राही दिसतो आहे. मात्र त्यापलीकडेही नेटकऱ्यांसाठी आकर्षणाची आणि चर्चेची गोष्ट ठरली, ती म्हणजे तिचा फिटनेस.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

२०१६ मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांना सैराट केले होते. यातल्या आर्ची आणि परश्याच्या जोडीला तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. रांगडी आर्ची आणि तिचे संवाद सगळ्यांनाच आवडून गेले.

रिंकूने साकारलेली आर्ची सगळ्यांच्या लक्षात राहिली. मात्र सध्या याच कारणामुळे रिंकू चर्चेत आहे. ‘सैराट’ चित्रपटाच्या वेळची रिंकू आणि आता या नवीन फोटोशूटमध्ये दिसणारी रिंकू यात जमीन-आस्मानचा फरक आहे आणि तो अगदी सहज दिसून येतोय.

तिच्या चाहत्यांनी अर्थातच तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी मात्र तिच्या या बारीक होण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘जुनी आर्चीच छान होती’ असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र बऱ्याच चाहत्यांनी तिच्या या बदललेल्या लूक चे ‘बारीक झालीये’, ‘मस्त दिसतेय’, ‘सुंदर’ अशा शब्दांत तोंडभरून कौतुक केलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

खरंतर रिंकूमधला हा बदल खूपच कौतुकास्पद आहे. ‘सैराट’ चित्रपटाच्या यशानंतर रिंकूने आपले वाचन वाढवले. वेगवेगळे चित्रपट बघायला सुरुवात केली. वेगवेगळ्या लोकांमध्ये ती वावरू लागली. याचबरोबर तिने आपल्या फिटनेसवरही लक्ष द्यायला सुरुवात केली.

वाढणाऱ्या वजनाला नियंत्रित ठेवण्यासाठी तिने योग्य आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रीत केले. तिचे हे नवीन फोटो पाहिल्यावर तिच्यात झालेला बदल किती लक्षणीय आहे, ते लगेच दिसून येत आहे.

You might also like