एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सैराट गर्ल’ आर्चीचा हा आहे आवडता अभिनेता! त्याच्यासोबत जायचे आहे डे’ट वर…

‘आर्ची’ हे नाव जरी घेतले तरी पुष्कळ आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत जो इतिहास रचला आहे, त्याचे काही श्रेय या आर्चीच्या भूमिकेलाही जाते. तिचं बिनधास्त वागणं, बेधडक बोलणं, रुबाबात चालणं अशा सगळ्याच गोष्टींनी महाराष्ट्राला वेड लावलं होतं. तिचे बिनधास्त डायलॉग घराघरात बोलले जाऊ लागले. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका मोठ्या चित्रपटात इतका सुंदर अभिनय करणे ही काही खायची गोष्ट नाहीये. पण आर्चीची भूमिका निभावणाऱ्या रिंकू राजगुरूने ते करून दाखवले. हेही एक कारण आहे की मराठी प्रेक्षक तिच्यावर खूप प्रेम करतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

तसं पाहायला गेलं तर ‘सैराट’ च्या वेळची रिंकू आणि आताची रिंकू यात खूप फरक आहे. रिंकूने स्वतःला फिट ठेवलं आहे. अभिनयाच्या बाबतीतही तिने खूप मजल मारली आहे. अनेक हिंदी प्रोजेक्ट्स मध्ये भाग घेत तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. काही मराठी चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. नुकताच तिचा ‘२०० हल्ला हो’ हा चित्रपट येऊन गेला. त्यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तिचा आजपर्यंतचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे.

रिंकू सोशल मीडिया वर देखील बरीच सक्रीय असते. आपल्या नवनवीन फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते. तिचे काही व्हिडिओ देखील ती अपलोड करत असते. अर्थातच सगळ्यांच्या लाडक्या ‘सैराट गर्ल’ च्या प्रत्येक फोटोला आणि व्हिडिओ ला हजारोंनी लाईक्स असतात. तिचे चाहते तिच्या सगळ्याच फोटोंवर कमेंट्स करतात. अर्थात या सगळ्या चांगल्याच कमेंट्स असतात कारण रिंकू सगळ्यांचीच खूप लाडकी आहे. तिचे चाहते नेहमीच तिचं कौतुक करताना दिसतात. तसेच तिच्यात झालेला बदल देखील सगळ्यांना आवडला आहे.

रिंकू राजगुरूने हल्लीच कलर्स मराठी वाहिनी वर झालेल्या ‘एकदम कडक’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिला प्रेक्षकांच्या मनात असलेले अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातले बरेच प्रश्न मजेशीर होते. रिंकूनेही खूप हसत खेळत या प्रश्नांची उत्तरे दिली. या कार्यक्रमादरम्यान तिला विचारण्यात आले, की तिला कोणासोबत डे’ट वर जायला आवडेल. यावर तिने क्षणाचाही विलंब न लावता ‘मला विकी कौशल सोबत डे’ट वर जायचे आहे’ असे सांगितले. त्यामुळे रिंकूचा आवडता अभिनेता ‘विकी कौशल’ आहे, असा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

You might also like