एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आप्पांच्या मुलीचे लग्न! किशोर महाबोलेंनी केला फोटो शेअर…

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांना खूप पसंत पडली आहे. या मालिकेत घडणाऱ्या नवनव्या घटनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. एकीकडे अरुंधती आणि अनिरुद्धच्या घटस्फोटाची तारीख जवळ येत आहे, तर दुसरीकडे यश आणि गौरीचा साखरपुडा काही विघ्नं येऊन अखेरीस सुखरूप पार पडला. अशावेळी याच मालिकेतल्या एका कलाकाराने मात्र एका लग्नाची मजा लुटली आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशचे लाडके पीटर म्हणजे आप्पा अरुंधतीच्या पाठीशी सदैव उभे असतात. अरुंधतीला सून न मानता तिला मुलीसारखा दर्जा देतात. त्यामुळेच ते प्रेक्षकांचेही लाडके आहेत. या आप्पांची भूमिका निभावली आहे किशोर महाबोले या अभिनेत्याने. किशोर महाबोले म्हणजेच मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील प्रसिद्ध असलेले नाव. हिंदी मध्ये त्यांनी ‘लेजंड ऑफ भगतसिंग’ (२००२) या चित्रपटात काम केले होते.

किशोर महाबोले गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मराठीमध्ये त्यांनी कुंकू झाले वैरी (२००५), आई शप्पथ…! (२००६), सखी (२००७), मॅरेथॉन जिंदगी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत त्यांनी फिरंगोजींची भूमिका साकारली होती. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतील अर्चनाच्या वडीलांची म्हणजेच मनोहर करंजकर यांची भूमिका त्यांनी केली होती. या भूमिकेमुळे ते घराघरांत जाऊन पोहोचले. यात त्यांनी एका प्रेमळ आणि काळजीवाहू बापाची भूमिका निभावली होती.

खऱ्या आयुष्यातही त्यांनी नुकतीच ही भूमिका पार पाडली आहे. नुकतेच किशोर महाबोले यांच्या मुलीचे लग्न झाले. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडिया वर शेअर केला आहे. “माझी मुलगी चि. सौ. कां. सृष्टीच्या लग्नात आपण आशीर्वाद पाठवले त्यामुळे लग्न निर्विघ्न पार पडले. धन्यवाद!” अशी कॅप्शन टाकत त्यांनी चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत.

किशोर महाबोले यांची मुलगी सृष्टी महाबोले चा विवाह थाटात पार पडला आहे. किशोर महाबोलेंनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सृष्टी आणि किशोर दोघेही खूप खूष दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच किशोर महाबोलेंच्या वडीलांचे नि’धन झाल्याची बातमी आली होती.

त्यानंतर त्यांच्या घरी घडलेल्या या मंगल कार्याने सर्वांची मने प्रफुल्लीत केल्याचे दिसत आहे. कोणत्याही बापासाठी आपली मुलगी सासरी जाताना बघणं हा जसा आनंद सोहळा असतो. किशोर महाबोलेंनी हा आनंदाचा क्षण नुकताच अनुभवला आहे. त्याबद्दल आमच्या टीमकडून त्यांचे अभिनंदन!

You might also like