एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दाक्षिणात्य अभिनेता साई धरम तेज च्या गाडीला अ’पघात; रुग्णालयात उपचार सुरू..

आघाडीचा दाक्षिणात्य अभिनेता साई धरम तेज च्या गाडीला अ’प’घात झाल्याची बातमी समोर येत आहे. शुक्रवारी रात्री तो त्याच्या बाईकवरून जात असताना हा अ’प’घात झाला. त्याने डोक्यावर हेल्मेट घातले असल्याने सुदैवाने त्याच्या डोक्याला कोणतीही इजा झालेली नाही.

काही किरकोळ जखमा सोडल्या तर या अ’प’घातादरम्यान त्याला कोणतीही मोठी इजा झालेली नाही, असे प्रथमदर्शनी जाणवले. नंतर उपचारासाठी नेल्यावर त्याच्या सॉफ्ट टिश्यूना दुखा’पत झाली असून गळ्याजवळच्या हाडाला (कॉलर बोन) फ्रॅक्चर झाले असल्याचे समजले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Dharam Tej (@jetpanja)

साई धरम तेज शुक्रवारी रात्री आपल्या बाईकवरून दुर्गम चेरुवु केबल ब्रिज वरून जात होता. त्यावेळी त्याचा अ’प’घात झाला. त्याला लागलीच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला ज्युबिली हिल्स येथील अपोलो हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले.

यासंदर्भात हॉस्पिटल कडून एक प्रेस स्टेटमेंट देखील जारी करण्यात आले आहे. यात त्यांनी सांगितले आहे, की ‘प्राथमिक तपासानंतर साई धरम तेज ला कोणतीही मोठी इजा झालेली नसल्याचे लक्षात आले आहे. त्याला सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून सध्यातरी कोणत्याच सर्जरीची आवश्यकता नाहीये.’

दरम्यान साई धरम तेज रिकव्हर होत असल्याचे ट्विट त्याचे मामा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे, की ‘फॅन्स नी काळजी करण्याचे काहीही कारण नाही. तो डॉक्टरांच्या निगराणीखाली बरा होत आहे आणि लवकरच तुमच्या भेटीसाठी परत येईल.

साई धरम तेज च्या टीमने देखील अशाच आशयाचे स्टेटमेंट दिले आहे. त्यांनी सांगितले, की ‘साई आता ठीक आहे आणि तो आता रिकव्हर होत आहे. काळजीचं कारण नाही. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची स्थिती स्थिर झाल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात दाखल केलं आहे.

चिरंजीवी यांच्या ट्विट नंतर अनेक दाक्षिणात्य सेलिब्रेटींनी ट्विट केले आहेत. अभिनेते सुधीर बाबू, ज्यु. एनटीआर यांनी ट्विट करत ३४ वर्षीय अभिनेता साई धरम तेज ला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच साई धरम तेज चा हैद्राबाद मध्ये देखील अ’प’घात झाला होता.

साई धरम तेज तेलगू चित्रपटांमध्ये काम करतो. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून कोणतीही गंभीर इजा न झाल्याने त्याच्या प्रकृतीस कोणताही धो’का नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

You might also like