एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आई बंगाली, वडील जर्मन; मात्र तरीही ही अभिनेत्री लावते मुस्लिम आडनाव! हे आहे कारण..

दिया मिर्झा हे नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभी राहते ‘रहना है तेरे दिल में’ मधली गोड बाहुलीसारखी दिसणारी रीना मल्होत्रा ही व्यक्तिरेखा. मात्र तेवढीच दिया मिर्झाची ओळख नाहीये. दिया मिर्झा हे बॉलिवूड मधील एक गाजलेलं नाव आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दिया मॉडेलिंग करत होती.

अभिनय क्षेत्रात येण्याचा तिचा आधी काही हेतू नव्हता. तिच्या फॅमिली फ्रेंडने तिला एका सौंदर्यस्पर्धेच्या ऑडीशन बद्दल सांगितले. ‘फेमिना मिस इंडिया २०००’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेत तिने सेकंड रनर अप चा मान पटकावला. पुढे तिला ‘मिस एशिया पॅसिफिक २०००’ या सौंदर्यस्पर्धेसाठी पाठवण्यात आलं आणि ही स्पर्धा दियाने जिंकली.

दियाने अनेक मॉडेलिंग असाइनमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामही केलं आहे. दियाचा जन्म हैद्राबादमध्ये झाला आहे. तिचे जन्मदाते वडील फ्रॅंक हॅन्ड्रिक हे जर्मन होते. तिची आई दीपा बंगाली आहे. दिया साडेचार वर्षांची असताना तिच्या आई-वडीलांचा घट’स्फो’ट झाला आणि तिच्या आईने अहमद मिर्झा या मुस्लिम माणसाशी दुसरे लग्न केले.

एका मुलाखतीत दियाने सांगितले, की तिचे हे दुसरे वडील तिला खूप जवळचे होते. तिच्या या दुसऱ्या वडीलांनी तिच्यावर नेहमीच खूप प्रेम केले आणि कधीच तिच्या पहिल्या वडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे दिया आपल्या नावापुढे आपल्या दुसऱ्या वडिलांचे आडनाव लावते.

दियाला मिस इंडिया स्पर्धेसाठी जेव्हा मुंबईला जावे लागणार होते, तेव्हा तिची आई तिला इतक्या लांब पाठवण्यास तयार नव्हती. मात्र दियाच्या वडिलांनी तिच्या आईला समजावले. त्याच दरम्यान एक मुलगा दियाच्या मागे लागला होता.

त्याच्यापासून सुटका व्हावी हा देखील दियाला मुंबईला पाठवण्या मागचा हेतू होता. वडिलांच्या पाठींब्यामुळे दिया मुंबईला गेली आणि त्यामुळेच तिच्या संधींची दारे उघडली. दिया आपले स्वप्न पूर्ण करू शकली. दिया आता केवळ एक मॉडेल आणि अभिनेत्री नाहीये. ती एक निर्माती देखील आहे.

२०११ मध्ये तिने आपला पहिला पती साहिल संघा बरोबर ‘बॉर्न फ्री एंटरटेनमेंट’ ही निर्मितीसंस्था सुरू केली. २०१४ मध्ये साहिल आणि दियाने लग्न केले. २०१९ मध्ये त्याच्याशी घट’स्फो’ट घेतल्यानंतर तिने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस ‘वन इंडिया स्टोरीज्’ सुरू केले. २०२१ मध्ये तिने उद्योगपती वैभव रेखी बरोबर लग्न केले. १४ जुलै २०२१ मध्ये तिला मुलगा झाला.

You might also like