एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मृ’त्यूच्या ६ दिवस आधी सिद्धार्थने केलं हे काम! तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल…

सिद्धार्थ शुक्ला या अभिनेत्याच्या अचानक जाण्याने संबंध इंडस्ट्री हळहळते आहे. एक उत्तम अभिनेता हरवल्याची प्रतिक्रीया इंडस्ट्री मधून मिळते आहे. वयाच्या केवळ ४० व्या वर्षी सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने नि’ध’न झाले.

गेले काही दिवस हे त्याचे अत्यंत भरभराटीचे दिवस होते. त्याच्या करिअर चा आलेख सध्या चढता होता. ऐन उमेदीच्या काळात त्याच्यावर असा काळाने घाला घातल्याने चाहत्यांसह सर्व देशभर दुःख व्यक्त केले जात आहे.

‘बिग बॉस १३’ या रिऍलिटी शो चे विजेतेपद पटकावल्यानंतर सिद्धार्थ कडे अनेक प्रोजेक्ट्स आले असल्याचे बोलले जात होते. मालिकांमधील सुरेख अभिनय, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, रिऍलिटी शो मधील त्याचे जिगरबाज व्यक्तिमत्व, चित्रपटसृष्टीत पदार्पण अशा अनेक गोष्टींमुळे सिद्धार्थ प्रेक्षकांचा लाडका बनला होता. त्याला अजून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. मात्र त्याच्या अशा अचानक जाण्याने प्रेक्षकांना फार वाईट वाटते आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

२ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ हे जग सोडून गेला. जाण्याआधी ६ दिवसांपूर्वी त्याने असे काही काम केले आहे, की ते बघून सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटेल. सिद्धार्थ सोशल मीडिया च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असायचा. त्याने भटक्या कुत्रांसाठी राबवत असलेल्या मोहिमेबद्दल एक ट्विट केले होते.

लॉक’डा’ऊन मुळे भटक्या कुत्र्यांना अनेक अड’च’णींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याने आवाहन केले होते, की या कुत्र्यांसाठी काही मदत करायची असल्यास असिफ बामला या व्यक्तीशी संपर्क साधा.

असिफ बामला यांनी याबाबत बोलताना सांगितले, की सिद्धार्थ काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांसाठी मोहीम राबवत होता. सिद्धार्थ त्याद्वारे भटक्या प्राण्यांच्या जेवणाची पूर्ण व्यवस्था बघत होता, असेही त्यांनी पुढे सांगितले. सिद्धार्थच्या या कृतीचे खूप कौतुक होत आहे.

काही माणसे गेल्यानंतर कोणाला काहीच फरक पडत नाही. मात्र सिद्धार्थ सारखी काही माणसे असतात, जी गेल्यानंतरही त्यांना जग त्यांच्या चांगल्या कामांसाठी कायम लक्षात ठेवतं. ‘मरावे परि किर्तीरुपी उरावे’ याचे सिद्धार्थ उत्तम उदाहरण ठरला आहे.

मित्रांनो, सिद्धार्थने समाजाला एक चांगला आदर्श घालून दिला आहे. तो असे समाजकार्य करत असल्यामुळे त्याच्या जाण्यानंतरही त्याचे नाव लोकांच्या मनात कायम अमर राहणार आहे. सिद्धार्थच्या चांगल्या कामाचा आदर्श घेण्यासाठी एक पाऊल नक्की पुढे टाका. वाटा आपोआप दिसू लागतील. त्या चांगल्या वाटेवर चालत राहा.

You might also like