एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिग बॉस मराठी ३ अपडेट: गायत्री की जय? कोण मारणार नव्या टास्कमध्ये बाजी?

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ या शो ची सध्या जोरदार हवा सुरू आहे. यामध्ये आता बिग बॉस एक नवा टास्क देणार आहे. गायत्री आणि जयला हा टास्क सोपवण्यात आला आहे. ‘खुल जा सिम सिम’ हा टास्क त्यांना देण्यात आला आहे. या टास्कमध्ये त्यांना स्पर्धकांकडे जाऊन त्यांचे नंबर मिळवायचे आहेत.

आता गायत्री सगळ्या स्पर्धकांना भेटून त्यांचे नंबर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. गायत्री आधी विकासशी बोलयला जाते. मात्र यावेळी विकासने तिला त्यांच्यात आधीच्या टास्कवरून झालेल्या वादाची आठवण करून देतो. त्यावेळी गायत्री त्याला ती फेअर खेळेल असे आश्वासन देते. ती सांगते, की ती जयपेक्षा जास्त फेअर खेळेल. यावेळी तिने जर ती कॅप्टन झाली तर बिग बॉसच्या घरात ती शांतता राखण्यास आणि टास्कमध्ये फेअर खेळ खेळण्यास मदत करेल असे म्हणते.

याशिवाय विकासने तिला त्याचा नंबर दिल्यास अजून एक फायदा असल्याचेही गायत्रीने यावेळी त्याला सांगते. आधीच्या टास्कमुळे या दोघांमध्ये जे वाद झाले होते, ते यानिमित्ताने मिटतील. दोघांमधील वादानंतर ही त्यांच्यामध्ये एक नवी सुरुवात असेल, असेही यावेळी गायत्री विकासला सांगते. विकास त्यावेळी कॅप्टन म्हणून ती त्याला बिग बॉसच्या घरात टिकवून ठेवण्यासाठी काय मदत करेल, असे विचारतो. यावर गायत्री तिच्या हातात जितकं असेल तेवढं ती करेल, असं आश्वासन देते.

त्यानंतर गायत्री विशालशी जाऊन बोलते. यावेळी विशाल तिला आठवण करून देतो, की तिच्याच टीमचे लोक तिच्याशी अनफेअर खेळले आहेत. यावर त्याने तिचं मत आधीच विचारून घेतलं. जय त्याच्याशी बोलायला देखील न आल्याने त्याची या विषयावर बोलण्याचीच इच्छा नाही असे तो गायत्रीला सांगतो. मात्र जे झालं त्यावरून आपल्याला कुणालाच मत देण्याची इच्छा नसल्याचं तो गायत्रीला सांगतो.

यावर गायत्री त्याला ‘जे झालं ते झालं, आपण फेअर खेळतो’ असे सांगते. जर ती कॅप्टन झाली तर ती घरात कोनाबरोबरच काही चुकीचे किंवा अनफेअर होऊ देणार नाही असं सांगते. विशाल तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला नंबर देईल का, हे आता येणाऱ्या भागामध्ये कळेलच.

हा टास्क कोण जिंकणार- गायत्री की जय? तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. Source and VC: Rajshri Marathi

You might also like