एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सिनेसृष्टीतील राजा माणूस! आता या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे नि’धन, केले आहे अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम..

या क’रोनाच्या देशावरील संक’टामुळे आपल्याला खूप सारे कलाकार गमवावे लागले त्यामुळे आज देखील एक दु’खत घट’ना घडली आहे. आत्ताच मिळालेल्या बातमी नुसार सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर ह्यांचे करो’नामुळे नि’धन झाले.

या लॉक’डाउ’नमध्ये काही दिवसांपूर्वी त्यांना क’रोनाची ला’गण झाली त्यामुळे त्यांना ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण दुर्दै’वाने आज दुपारी १२वाजून ३० मिनिटांनी त्यांची प्रा’णज्योत मावळली. किशोर यांनी मराठी न्हवे तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील छाप सोडली काही दिवसांपूर्वी त्यांना दम लागणे, छातीत धडधडणे असे शा’रीरिक त्रा’स सुरू झाले होते.

यावर उ’पचार घेण्यासाठी त्यांना बायपास करावा लागला किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत ४० नाटके ३० हुन अधिक हिंदी मराठी चित्रपटात काम केलं होतं तसेच २०हुन अधिक मालिकांमध्ये काम केलं आहे.

किशोर यांच्या नाटक रंगभूमीबद्दल बोलायला गेलं तर त्यांचं शेवटच नाटक  ‘नाना करते प्यार’ हे होत, हे त्यांनी व्यवसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटच नाटक होत, त्याचबरोबर किशोर यांनी  ‘विच्छा माझी पुरी करा’ हे पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शिका नाटक नव्याने रंगभूमीवर आणलं.

याबरोबरच  ‘वासूची सासू’ हे नाटक सुद्धा त्यांनी नव्याने केलं होतं पण ह्यातील जुनी भूमिका करणारे प्रभावळकर यांच्या जागी किशोर नांदलस्कर यांनी ही भूमिका खूप छान रित्या पेलली. ह्या दोन्ही नाटकातील भूमिका त्यांनी त्यांच्या पद्धतीने पार पाडल्या.

व्यावसायिक नाट्यरंगभूमीवर किशोर यांनी आत्तापर्यंत ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ इत्यादी., नाटकांमधून लोकांसाठी मनोरंजन निर्माण केलं.

सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ ह्या चित्रपटातुन त्यांना विशेष ओळख निर्माण झाली, ह्या वरील गाजलेल्या चित्रपटाबरोबरच त्यांनी महेश मांजरेकर यांची फिल्म ‘वास्तव’ मधून बॉलिवूड मध्ये प्रवेश मिळवला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’ ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ ह्या चित्रपटातून त्यांनी रंगवलेल्या भूमिका लोकांना विशेष आवडल्या.

किशोर नांदलस्कर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक चांगला अभिनेता गमवावा लागला त्यांच्या हयात त्यांना बायको आणि ३ मुले आहेत.

त्यांनी केलेल्या मराठी रंगभूमीवरील प्रेमासाठी, आमचे आजपर्यंत मनोरंजन केले अश्या ह्या उत्तम नटाला आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांनकडून भावपूर्ण श्रद्धांजली !

You might also like